पंतप्रधान मशिदीत; ‘वसुधैव कुटुंबकम’चा नारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2018
Total Views |

 


 
 

इंदौर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इंदौर येथील दाऊदी बोहरी समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. याप्रसंगी इंदौर येथील मशिदीमध्ये जाऊन मोदींनी दाऊदी बोहरी समाजाचे धर्मगुरू सैयदना मफुद्दल सैफुद्दीन यांची भेट घेतली. यावेळी केलेल्या भाषणात मोदींनी बोहरी समाजाशी त्यांचे जुने नाते असल्याचे सांगितले. बोहरी समाज हा देशभक्त आहे असे म्हणत मोदींनी त्यांचे कौतुकही केले. पंतप्रधान मोदींनी बोहरी समाजाच्या कार्याक्रमात सहभागी होणे ही खूप मोठी गोष्ट आहे” असे धर्मगुरू सैयदना याप्रसंगी म्हणाले.

 
 
 
 
 

यापूर्वी पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना बोहरी समाजाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. इंदौर येथील मशिदीतील आपल्या भाषणात त्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ चा नारा दिला. तसेच आपण सगळ्यांनी एकत्रित होऊन चालले पाहिजे. एकात्मता हीच आपली शक्ती आहे त्यामुळेच आपला देश आज जगात इतर देशांहून वेगळा ठरत आहे. बोहरी समाज भारताच्या याच शक्तीची जगाला ओळख करून देत आहे. असेही मोदी म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@