हाफिज सईदच्या ’जमात-उद-दावा’वरील बंदी हटविली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2018
Total Views |

 
 

इस्लामाबाद : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या संघटनेवर घालण्यात पाकिस्तान उच्च न्यायालयाने घातलेली बंदी आता हटवली आहे. या संघटनेकडून दहशतवादी कारवाया करण्यात येत असल्याचे उघडकीस आल्यानंतर, पाकिस्तान सरकारकडून या संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे हाफिज सईदची ’जमात-उद-दावा’ही संघटना पुन्हा कार्यान्वित होणार आहे.

पाकिस्तामधील सुप्रीम कोर्टाने हाफिज सईदच्या ’जमात-उद-दावा’ या संघटनेवरील बंदी हटविली असून, या संघटनेमार्फत देशात सामजिक कार्य करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे सर्वच देशांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हाफीज सईद याच्या संघटनेचे पाकिस्तानात मोठे जाळे पसरले आहे. या संघटनेच्यामार्फत तिनशे शाळा, रुग्णालये, पब्लिशिंग हाऊस आणि रुग्णवाहिका सेवा पुरवल्या जातात. या संघटनेत जवळपास पन्नास हजार सदस्य आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले होते. पाकिस्तानने आपण दहशतवादाच्या विरोधात कठोर कारवाया करू असं म्हणत असताना हाफिजच्या संघटनेवरील बंदी उठवल्यामुळे, पाकिस्तानच्या धोरणाबाबत पुन्हा एकदा प्रश्चचिन्ह उभे राहिले आहे.

    

           माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
@@AUTHORINFO_V1@@