राज्यात पुन्हा स्वाईन फ्लूचे थैमान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2018
Total Views |


 


नाशिक: बदलते हवामान आणि वाढता उकाडा यामुळे राज्यात स्वाईन फ्लूचे पुन्हा पडसाद उमटू लागले आहेत. नाशिक महानगर पालिका क्षेत्रात स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. स्वाईन फ्लू मुले सोमवारी येवला येथे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. नाशिकमध्ये सर्वाधिक ५४ रुग्ण आढळुन आले आहेत. या आधी जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान नाशिकमध्ये १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक स्वाईन फ्लूचे रुग्ण हे सिन्नर तालुक्यात आढळले आहेत.

 

गणेशोत्सवाच्या काळात साथीचे रोग वाढू नये म्हणून पालिकेच्या बांधकाम, वैद्यकीय आरोग्य आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या शनिवार आणि रविवारच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. आरोग्याची समस्या दूर करण्याचे आदेश आयुक्‍तांनी दिले आहेत. याच प्रमाणे पिंपरी आणि कल्याण या ठिकाणी ही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. पिंपरी येथे स्वाईन फ्लूने आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. पालिका आयुक्तांनी या सर्व गोष्टींची गंभीर दाखल घेत ऐन उत्सवात स्वछता ठेवण्याचे आव्हान केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@