बारामुल्लात दोन दहशदवाद्यांचा खात्मा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2018
Total Views |



जम्मू काश्मीर : सीआरपीएफ, राज्य पोलीस आणि राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी बारामुल्ला जिल्ह्यात दोन दहशदवाद्यांचा खात्मा केला आहे. सोपोर भागात काही दहशदवादी लपल्याची माहिती भारतीय जवानांना मिळाली होती. त्यानुसार जवानांनी नाकेबंदी करत ही कारवाई केली. या कारवाईत डीएसपी सह ९ पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे.

 

देशभरात बाप्पाच आगमन होत असताना आज सकाळी ही घटना घडली. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोपोर भागात काही दहशदवादी लपल्याची माहिती मिळताच पूर्णपणे नाकाबंदी करून कारवाई करण्यात आली. दोन्हीकडून गोळीबार करण्यात आला. यात भारतीय जवानांना दोन दहशदवादी टिपण्यात यश आले आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@