रामदेव बाबा दुग्धव्यवसायात उतरणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2018
Total Views |


 

 

नवी दिल्ली : योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजलि स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांना भारतीय ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पतंजलिने आता दुग्धव्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवरील एका कार्यक्रमात रामदेव बाबांनी आपल्या दुग्ध उत्पन्नांची घोषणा केली. यामध्ये दूध, दही, पनीर आणि ताक यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे इतर कंपन्यांपेक्षा पतंजलिचे प्रोडक्क्ट दोन रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.

 

 

पतंजलि उद्योग समूहाने यापूर्वीच आयुर्वेद इतर उत्पादनांमध्ये उडी घेत आपला दरारा निर्माण केला आहे. दुग्ध व्यवसायात उडी मारतानाच दोन रुपये कमी भाव ठेऊन पतंजलि धमाका करणार असल्याचे संकेत दिले आहेत. पतंजलीच्या या प्रॉडक्टची आजपासून विक्री सुरु झाली. तर लवकरच फ्लेवर्ड दूधही बाजारात आणले जाणार असल्याची माहिती पतंजलिने दिली आहे. दरम्यान, पतंजलीने २०२० पर्यंत १० लाख लीटर दूध उत्पादन करण्याचे लक्ष ठेवले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@