कोकणात जाणारे चाकरमानी खोळंबले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2018
Total Views |

 
रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी कोकणात रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. कोकण रेल्वे मार्गाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गाड्या पाच तास उशिराने धावत आहेत. बहुतांश चाकरमानी गणेशोत्सवासाठी आठ दिवस आधीच कोकणात दाखल झाले होते. मात्र, काहींनी बुधवारी रात्री कोकणात जाण्यासाठी रेल्वेने प्रवास केला, मात्र वेळापत्रक कोलमडल्याने त्यांना वेळेवर पोहोचता आले नाही.
 
 
कोकण रेल्वेच्या बऱ्याच गाड्या अर्धा तास उशिराने तर काही गाड्या सुमारे पाच तास उशिराने धावत आहेत. डाऊन मांडवी, डबल डेकर, दुरांतो, हापा, निझामुद्दीन एक्सप्रेस वगळता इतर सर्व गाड्या उशिराने धावत आहेत. सर्वच गाड्यांना मोठी गर्दी झाली आहे. ट्रेन बंचिंगमुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याने गाड्या एकामागे एक थांबल्या आहेत.
 
 
उशीरा धावत असलेल्या गाड्या
  
- रत्नागिरी-दादर पॅसेंजर २ तास उशिराने
 
- दिवा- सावंतवाडी पॅसेंजर दीड तास उशिराने
 
-  तेजस एक्सप्रेस एक तास उशिराने
 
-  लोकमान्य टिळक-करमाळी एसी सुपरफास्ट अडीच तास उशिराने
 
- नेत्रावती अर्धा तास उशिराने
 
- सावंतवाडी-पुणे दीड तास उशिराने
 
- झाराप-पुणे विशेष साडे तीन तास उशिराने
 
- मंगळूर-वांद्रे विकली स्पेशल ५ तास उशिराने
 
- २२६३० तिरुनवेली-दादर साडे तीन तास उशिराने
 
-  ११००३ तुतारी ५५ मिनिटे उशिराने
 
 
      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/  
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@