वर्षावर श्री गणेशाची प्रतिष्ठापना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2018
Total Views |


 

 

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी सपत्नीक श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. वर्षावर १० दिवसाचा गणपती असणार असून मुख्यमंत्र्यांनी श्री गणेशाचे मोठ्या मनोभावाने पूजन केले. बळीराजा सुखी व्हावा, दुष्काळी भागात पाऊस पडावा आणि नागरिकांना सुखसमाधान, चांगले आरोग्य मिळावे, अशी प्रार्थना त्यांनी गणरायाकडे केली. तसेच गणेशोत्सवानिमित्त त्यांनी जनतेला शुभेच्छा देखील दिल्या.

 
 
 

यावेळी ते बोलताना म्हणाले की, "जात, धर्म, भाषा, पंथ यापलीकडे जाऊन लोकांनी संघटित व्हावे यासाठी लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरु केला होता. तो आजदेखील अव्याहत सुरु असून नागरिकांनी कोणत्याही भेदाच्या पलीकडे जाऊन हा उत्सव साजरा करावा."

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@