सुतगिरणी प्रकरणी धनंजय मुंडे अडचणीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2018
Total Views |





बीड: राज्यात गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याची प्रलंबित असलेल्या न्यायालयीन प्रकिया अखेर सुरु झाली आहे. याप्रकरणी सत्र न्यायालयाने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना चांगलाच दणका दिला आहे. परळीतील संत जगमित्र सूतगिरणीच्या तीन कोटी कर्ज वसुलीसाठी धनंजय मुंडे यांच्यासह आठ जणांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार, या मालमत्तेची विक्री आणि व्यवहार करता येणार नाही.

 

धनंजय मुंडेंना त्यांचे घर, सूतगिरणीचे कार्यालय आणि विविध ठिकाणी असलेल्या मालमत्तेचे यापुढे व्यवहार करता येणार नाहीत, असे कोर्टाने सांगितले आहेत. यामध्ये त्यांच्या देशमुख टाकळी, कौडगाव, जलालपूर इथल्या शेतजमिनी आणि परळीच्या अंबेजोगाई येथील त्यांच्या घराचा समावेश आहे.

 

संत जगमित्र सहकारी सूतगिरीणीसाठी बीड जिल्हा सहकारी बँकेकडून कर्ज घेताना अनेक नियमांचे उल्लंघन केले गेले होते. यानंतर बेकायदेशीर कर्ज वितरण प्रकरणी २ ऑक्टोबर २०१३ रोजी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी विशेष तपस पथकाने तीन वर्षानंतर ११ जुलै २०१६ रोजी दोषारोप पात्र परळी न्यायालयात दाखल केले होते. या दोषारोप पत्रात बँकेच्या तत्कालीन संचालकांसह विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अमरसिंह पंडित, सुभाष सारडा, राजाभाऊ मुंडे आणि धैर्यशील साळुंखे यांचा समावेश आहे. गेली बरीच वर्ष हे प्रकरण रखडले होते. यामुळे न्याय मिळण्यासाठी सर्व ठेवीदार शेतकऱ्यांचे लक्ष या निकालाकडे लागले होते.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@