बँकांमधील घोटाळे आणि कॉंग्रेस पक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

राजन यांची प्रतिमा मोदीसमर्थक अशी नाही. देशहिताचे तसेच अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जे योग्य असेल त्याचा पुरस्कार करणारी राजन यांची प्रतिमा आहे. त्यासाठी वेळ पडली तर आपल्या अधिकाराचा उपयोग करत सरकारची कानउघाडणी करायला ते मागेपुढे पाहात नाहीत. विशेष म्हणजे राजन कोणत्याही राजकीय दबावाखाली येणारे नाहीत. त्यामुळे राजन जे बोलले त्यात निश्चितच तथ्य असले पाहिजे. कारण ‘उचलली जीभ लावली टाळूला’ या वर्गातील ते नाहीत. दुसरे म्हणजे त्यांना विद्यमान सरकारकडून कोणताही आर्थिक लाभ घ्यायचा नाही. तसा लाभ घेण्याची संधी त्यांनी आपल्या हातानेच दूर केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद दुसर्यांदा मिळण्याची शक्यता असतानाही त्यांनी ते नाकारले.
 
 
बँकिंग क्षेत्रातील मोठ्या घोटाळ्याची यादी रिझर्व्ह बँकेने पंतप्रधान डॉ. मनमोहनिंसग यांच्या कार्यालयाकडे कारवाईसाठी पाठवली होती, मात्र पंतप्रधान कार्यालयाने या यादीतील दोषी उच्चपदस्थांवर कोणतीच कारवाई केली नाही. संपुआच्या कार्यकाळात 2006 ते 2008 या काळात दिलेल्या कर्जामुळे बँकांमधील बुडीत कर्जाचे प्रमाण वाढल्याचा आरोपही राजन यांनी केला आहे. 2006 ते 2008 या काळात डॉ. मनमोहनिंसग पंतप्रधान असले, तरी सरकारची सर्व सूत्रे मात्र श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडे होती. डॉ. मनमोहनिंसग यांच्या कर्तृत्वाबद्दल पूर्ण आदर व्यक्त करून असे म्हणावेसे वाटते की, ते फक्त नामधारी पंतप्रधान होते. पंतप्रधान कार्यालयात कोणते अधिकारी राहतील, याचा निर्णयही श्रीमती सोनिया गांधी घेत होत्या आणि या आपल्या विश्वासू अधिकार्यांच्या मार्फत पंतप्रधान कार्यालय आणि सरकार चालवत होत्या.
 
रघुराम राजन जे बोलले त्याला औपचारिकपणे डॉ. मनमोहनिंसग जबाबदार असले, तरी या घोटाळ्याची खरी जबाबदारी त्या वेळी कॉंग्रेसच्या अध्यक्ष असलेल्या श्रीमती सोनिया गांधी यांना नाकारता येणार नाही. त्यामुळेच रघुराम राजन यांची अंदाज समितीसमोरील साक्ष म्हणजे कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराचा पेटारा असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. रायबरेली आणि अमेठी या गांधी घराण्याचा बालेकिल्ला असणार्या मतदारसंघात श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी या मायलेकाला आव्हान देणार्या लढाऊ नेत्या म्हणून स्मृती इराणी ओळखल्या जातात. स्मृती इराणी यांनी तर 2014 मध्ये अमेठी मतदारसंघात निवडणूक लढवून राहुल गांधी यांच्या तोंडाला फेस आणला होता. शेवटी अमेठीमध्ये राहुल गांधी आपली निवडणूक कसेबसे जिंकले असले, तरी त्यांचे मताधिक्य काही लाखाने कमी करण्यात स्मृती इराणी यशस्वी झाल्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून गांधी घराण्याचे दिवस फिरले आहेत. 2011 आणि 2012 मधील करआकारणीची फाईल नव्याने उघडण्याच्या आयकर खात्याच्या निर्णयाला आव्हान देणारी या मायलेकाची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मुळात या फाईल नव्याने उघडायला या मायलेकाचा विरोध का आहे? याचाच अर्थ, या मायलेकाने या फाईलमध्ये काही दडवले आहे, नव्याने त्याची तपासणी झाली तर आपला भ्रष्टाचार उघडकीस येईल, अशी भीती या मायलेकाला वाटते आहे, त्यामुळे त्यांचा याला विरोध होता, अशी शंका घ्यायला पूर्ण जागा आहे.
 
 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1999 आणि 2014 चा अपवाद वगळता देशात कॉंग्रेसचीच एकहाती सत्ता राहिली आहे. यातील सहा निवडणुकांत कॉंग्रेसला निर्विवाद बहुमत मिळाले, तर चार निवडणुकीत कॉंग्रेसने आघाडी सरकारचे नेतृत्व केले. अनिर्बंध सत्ता माणसाला जास्त भ्रष्ट बनवत असते. कॉंग्रेसची स्थिती नेमकी तशीच झाली आहे. कॉंग्रेसच्या 49 वर्षांच्या राजवटीत अनेक मोठमोठे घोटाळे झाले. यातील अनेक घोटाळ्यांची रक्कम काही हजार कोटींच्या घरातील आहे. देशात आपलीच सत्ता राहणार आहे, आपल्या सत्तेला कोणी आव्हान देऊ शकणार नाही, त्यामुळे मग कसेही वागले आणि कितीही घोटाळे केले तरी आपणच सत्तेवर येणार, त्यामुळे आपले घोटाळे कधीही उघडकीस येणार नाही, असा कॉंग्रेस नेत्यांचा समज झाला होता.
 
 
 
कॉंग्रेसच्या राजवटीत घोटाळ्यांची सुरुवात श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून झाली. याचा अर्थ त्याच्या आधी घोटाळे झाले नाहीत, असे नाही. नेहरूंच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, पण त्याचा संबंध पंडित नेहरूंपर्यंत प्रत्यक्ष पोहोचला नाही. कॉंग्रेसच्या राजवटीतील पहिला आर्थिक घोटाळा नगरवाला बँक घोटाळा म्हणून समोर आला. म्हणजे बँक घोटाळा आणि कॉंग्रेस यांचा संबंध आजचा नाही तर फार जुना आहे. नगरवाला बँक घोटाळ्यात श्रीमती इंदिरा गांधी यांच्या आवाजात बँकेत दूरध्वनी करून काही लाख रुपये काढून घेण्यात आले होते. याचाच अर्थ बँकांतून तेव्हाही बेकायदेशीरपणे पैसे काढले जात होते. पण, नगरवाला प्रकरणाने या गोष्टीचा पर्दाफाश झाला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जे म्हटले की, कॉंग्रेसमधील भ्रष्टाचाराचा उगम यात आहे, ते खोटे नाही.
 
 
गांधी घराण्याचा कोणताही दर्शनीय असा व्यवसाय नाही, शेती असल्याचेही ऐकिवात नाही, ज्यातून त्यांना नियमित उत्पन्न होईल. मग गांधी घराण्याकडे एवढा पैसा आला कुठून? खासदार म्हणून मायलेकाला मानधन मिळते, पण त्यातून कोणी एवढे श्रीमंत होऊ शकत नाही. याचाच अर्थ, कॉंग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या काही हजार कोटींच्या भ्रष्टाचारात त्यांना हिस्सा मिळाला असावा वा त्यांनीच भ्रष्टाचार केला असावा. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव बोफोर्स तोफांच्या भ्रष्टाचारात आले होते आणि त्याची किंमतही राजीव गांधींना आणि कॉंग्रेस पक्षाला चुकवावी लागली होती. मात्र, त्यापासून श्रीमती सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी काही धडा घेतल्याचे दिसत नाही.
 
 
 
काही वर्षांपूर्वी एका परदेशी मासिकात विकसनशील देशातील 14 राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल एक लेख आला होत, त्यात भारतातील राजीव गांधी यांच्या नावाचा उल्लेख होता. राजीव गांधींजवळ 2.5 बिलियन डॉलरची संपत्ती असल्याचा उल्लेख होता. राजीव गांधींच्या मृत्यूनंतर ही संपत्ती श्रीमती सोनिया गांधी यांची झाली. या संपत्तीत नंतर संपुआच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात निश्चितच भर पडली असावी. त्यामुळे श्रीमती सोनिया गांधी महाराणी एलिझाबेथ आणि ओमानच्या सुलतानापेक्षा श्रीमंत असल्याचा आरोप केला गेला. प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वड्रा यांच्याजवळ 11 हजार कोटींची संपत्ती असल्याचा आरोपही विदेशी माध्यमांत झाला होता. हा पैसा कुठून आला, याचे उत्तर श्रीमती सोनिया गांधी आणि कॉंग्रेस अध्यक्ष असलेल्या राहुल गांधी यांनी दिले पाहिजे.
 
परदेशी बँकांत असलेल्या पैशामुळे तर श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी वारंवार परदेशाच्या वार्या करत नाही ना? देशातील बँका बुडवून परदेशातील बँकांची तिजोरी भरण्याचा हा प्रकार धक्कादायक म्हणावा लागेल. श्रीमती सोनिया गांधी यांच्या पत्रामुळे एका मोठ्या उद्योगपतीला राष्ट्रीयीकृत बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याबाबतच्या बातम्याही काही वर्षांपूर्वी आल्या होत्या. त्यामुळे रघुराम राजन जे बोलले त्यावर विश्वास बसतो. केंद्र सरकारने रघुराम राजन तसेच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विधानाची गंभीरपणे दखल घेत याची चौकशी केली पाहिजे, म्हणजे ‘दूध का दूध पानी का पानी’ होऊन जाईल...

श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@