डिकोल्ड टोटल, सॅरिडॉनवर सरकारची बंदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2018
Total Views |



नवी दिल्ली: डिकोल्ड टोटल आणि सॅरिडॉनसारख्या ३२७ औषधांवर केंद्र सरकारने बंदी आणली आहे. ड्रग टेक्नॉलॉजी अॅडव्हायजरी बोर्ड अर्थात डीटीएबीने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने ३२८ औषधांमध्ये ताप, सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी अश्या आजारांवर वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाने लागू केलेल्या माहितीनुसार, औषध बनवणाऱ्या आणि त्याचे डिस्ट्रिब्युशन करणाऱ्या कंपन्यांनी सहा वेगवेगळ्या कॉम्बिनेशनच्या औषध विक्रीवर बंदी घालण्यास सांगितले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एबॉट सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत पिरामल, मॅक्सिऑड्स, सिप्ला आणि ल्यूपिन सारख्या घरगुती औषध निर्मात्या कंपनीच्या औषधांवर प्रभाव होणार आहे.

 

औषधनियंत्रक विभागाकडे आलेल्या तक्रारींची दखल घेत दोन वर्षांपूर्वी अशा ३४३ वेगवेळ्या कॉम्बिनेशन असलेल्या औषधांवर अखेर बंदी जाहीर केली होती , मात्र या निर्णयाविरोधात औषध कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. अश्या औषधांचा समावेश फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) या प्रकारात होतो. अमेरिका, जापान, फ्रान्स, जर्मनी आणि इंग्लंडसारख्या अनेक देशांमध्ये एफडीसीवर बंदी आहे. भारतासह अन्य काही देशांमध्ये ही औषधे विकली जात आहे. भारत सरकारने ज्या ३२७ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) गोळ्यांबर बंदी घातली आहे. त्याचा भारतातील व्यवसाय ३८०० कोटी रूपयांचा आहे. भारताच्या फार्मा सेक्टरच्या तीन टक्के हा व्यवसाय आहे. मार्केट रिसर्च फर्म एआयओसीडी फार्मा ट्रॅकनुसार, एफडीसीजवर बंदी घातल्यास देशातील एक लाख कोटी रुपयांच्या औषध बाजारात जवळपास दोन टक्के म्हणजेच २००० कोटी रुपयांचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@