...म्हणून दिगंबर नाईक आणतात दोन गणपती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2018
Total Views |



 

 

मुंबई : आज गणेश चतुर्थी दिवशी घराघरात गणरायाचे आगमन झाले. मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या घरीदेखील गणपती बाप्पा विराजमान झाले. अभिनेते दिगंबर नाईक यांच्या घरीही बाप्पा आले. पण वैशिष्ट्य म्हणजे दिगंबर नाईक यांच्या घरी दोन गणपतींची स्थापना झाली आहे. गेली अनेक वर्षे दिगंबर त्यांच्या घरी गणपतीच्या दोन मुर्त्या आणतात. महाएमटीबीशी संवाद साधताना दिगंबर नाईक यांनी यामागील कारण सांगितले.
 

दिगंबर नाईक यांना या दोन गणपतींबद्दल विचारले असता “सगळ्यांच्या घरी एकच बाप्पा, आमच्या घरी मात्र दोन दोन बाप्पा!” असे उत्तर ते हसत हसत देतात. नाईक यांच्या घरी गेली अनेक वर्षे ही परंपरा चालू आहे. लहानपणी त्यांनी आईला याबद्दल विचारले होते. परंतु गणपतीच्या दोन मुर्त्या घरी आणण्यामागील कारण हे त्यांच्या आजीला देखील माहित नव्हते, असे ते सांगतात. नाईक यांच्या घरी या दोन्ही गणपतींची यथासांग पूजा केली जाते. दोन गणपती आणण्यामागील कारण स्पष्ट नसले, तरीही दिगंबर यांनी ही त्यांच्या वाडवडिलांपासून चालत आलेली परंपरा आजवर कायम ठेवली आहे. तसेच यापुढे त्यांचा मुलगा ही परंपरा कायम ठेवेल, असा त्यांना विश्वास आहे. दिगंबर यांच्या गावच्या घरात ही परंपरा होती. आता दोन वर्षांपूर्वी त्यांच्या मुंबईच्या घरी त्यांनी या दोन्ही गणपतींची स्थापना करण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही बाप्पांच्या येण्याने आमचा आनंद द्विगुणित होतो.” असे दिगंबर म्हणाले. नुकतेच दिगंबर नाईक यांचे ‘वस्त्रहरण’ हे नाटक रंगभूमीवर पुन्हा अवतरले आहे. तसेच झी मराठीवरील त्यांची ‘गाव गाता गजाली’ ही मालिका देखील पुन्हा सुरू होतेय. “हे सारे गणपती बाप्पांचे आशिर्वाद आहेत.” असे दिगंबर म्हणतात.

 
     माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
@@AUTHORINFO_V1@@