जंगलातील शस्त्रधारींपेक्षा शहरी माओवादीच धोकादायक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Sep-2018
Total Views |

 


 
 
स्मिता गायकवाड यांचे प्रतिपादन
 

मुंबजंगलातील शस्त्रधारी माओवाद्यांपेक्षा शहरी माओवादी हे अधिक धोकादायक आहेत. ही सगळी मंडळी समाजात बुद्धिजीवी म्हणून वावरतात. कबीर कला मंचासारख्या संस्थामाओवादी विचारांचा प्रचार आणि प्रसार करत असतात. सरकारवर दबाव आणण्यासाठी, वैद्यकीय मदतीसाठी, अर्थ व्यवस्थापनासाठी, माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी, परदेशीसंपर्कासाठी माओवाद्यांना शहराशी असणारा हा संबंध उपयोगी पडतो. विविध माध्यमांतून संविधान उलथून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. समाजात मोकळेपणे वावरण्याच्या अधिकाराचा आज समाजाच्याच विनाशासाठी वापर केला जात आहे.असे मत कॅ. स्मिता गायकवाड यांनी आज मांडले. दादर येथील कीर्ती महाविद्यालयाच्या बी.एम.एम.विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. स्मिता गायकवाड या शहरी माओवादाच्या अभ्यासक आहेत.

 

या व्याख्यानात कॅ. स्मिता पुढे म्हणाल्या की, “माओवादी चळवळ ही युद्धाची चौथी पिढी आहे. समाजातील बुद्धिवादी लोकांकडून विविध अद्ययावत साधनांचा वापरमाओवादी विचारांच्या प्रसारासाठी करून घेतला जात आहे. सोशल माध्यमांवर “मीटूअर्बननक्षल”सारखे हॅशटॅगचे ट्रेण्ड्स यासाठी चालवले जात आहेत. माओवादाच्या समर्थनार्थविविध पोस्ट लिहिल्या जात आहेत. या सार्‍याचा समाजावर, विशेषतः तरुणांवर अधिक प्रभाव पडलेला दिसून येतो. अनेकदा हे ट्रेण्डस जाणीवपूर्वक चालवले गेले आहेत. काहीजण जाणीवपूर्वक तर काहीजण नकळत हे ट्रेण्डस फॉलो करताना दिसत आहेत. तरुणांना या विषयाचे गांभीर्य समजावून देणे हे सुजाण नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. माओवादीचळवळ ही आदिवासींच्या आणि दलितांच्या कल्याणासाठी लढवली जात आहे, अशी धूळफेक गेली पन्नास वर्षे जनतेच्या डोळ्यात करण्यात येत आहे. वास्तविक बस्तर किंवातत्सम नक्षलप्रभावित भागात कोणत्याही स्वरुपाची प्रगती होऊ नये म्हणून माओवादी मंडळी सतत प्रयत्नशील असतात. साधी रस्तेबांधणी, मोबाईल टॉवरची बांधणी देखीलपोलीसांच्या मदतीशिवाय होऊ शकत नाहीत. या क्षेत्रात माओवाद्यांच्या परवानगीशिवाय एखादे पाऊल उचलल्यास लोकांना आपल्या प्राणासही मुकावे लागले आहे. ज्यासंविधानाने दलितांना जगण्याचा अधिकार मिळवून दिला आहे, ते लोक संविधान उलथून टाकण्याची भाषा करतील का परंतु मदतीच्या नावाखाली माओवाद्यांकडून दलितांचा वापरकरून घेतला जात आहे.”, असे मत स्मिता गायकवाड यांनी यावेळी मांडले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@