...तरीही भारतीय संघ नंबर वन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Sep-2018
Total Views |



 
 
मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत भारताचा इंग्लंडकडून ४-१ असा दारुण पराभव झाला. तरीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमवारीत भारत अव्वल स्थानी आहे. भारतीय संघाच्या खात्यात ११५ गुण आहेत. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील पराभवामुळे संघाला १० गुणांची घट झाली आहे.
  
 
 

इंग्लंडने मात्र या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. सातव्या क्रमांकावरून सरळ चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यांनी भारताला पराभूत करून ८ गुणांची कमाई केली आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे १०६ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. न्यूझीलंडची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यानंतर श्रीलंका सहाव्या, पाकिस्तान सातव्या तर वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि झिम्बावे हे अनुक्रमे आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.

 
@@AUTHORINFO_V1@@