पोलिसांनी परत मिळवून दिले १०१ मोबाईल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Sep-2018
Total Views |

 


 
 
पिंपरी- चिंचवड : वाकड येथील पोलिसांनी पिंपरी चिंचवडमधील तब्बल १०१ नागरिकांना त्यांचे हरवलेले मोबाईल फोन परत मिळवून दिले आहेत. हे मोबईल तक्रारदारांना परत करण्यासाठी वाकड पोलिसांनी ‘मिसिंग मोबाइल प्रदान सोहळा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. चोरट्यांकडून हे १०१ मोबाईल फोन परत मिळवण्यात पोलिसांना यश आले. हे १०१ मोबाईल फोन्स तब्बल १२ लाख रुपये किंमतीचे होते. या कार्यक्रमाद्वारे पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी चोरीला गेलेले फोन त्यांच्या मालकांना परत मिळवून दिले. मोबाईल फोन परत मिळालेल्या नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. आपले हरवलेले मौल्यवान मोबाईल फोन परत मिळाल्याने पोलिस व कायदेयंत्रणा यांविषयी नागरिकांच्या मनात असलेली विश्वासार्हता वाढली आहे.
 

 

 

"मौल्यवान वस्तू वापरताना नागरिकांनीही काळजी घ्यायला हवी", असे आवाहन अप्पर पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांनी नागरिकांना केले. तसेच "मोबाईल कसा, कुठे व कधी चोरीला गेला याच्या मूळाशी वाकड पोलिसांचे शोधपथक गेले. मोबाईल चोरीला गेला की इतर व्यक्तीमार्फत त्याचा वापर सुरु असतो. त्यामुळे मोबाईल ट्रॅक करणे सोपे झाले. यामुळे मोबाईल चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. वाकड पोलिसांनी केलेली हे कार्य पिंपरी चिंचवडमधील इतर पोलिस स्टेशनमध्येही करण्यात येईल." असेही ते म्हणाले.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@