गणेशोत्सवासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Sep-2018
Total Views |

 

मुंबई : यंदा गणपतींचे आगमन खड्ड्यांतूनच होणार असले तरीही कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी चोख उपाययोजना केल्या आहेत. मुंबईकर आणि राज्यभरातील भाविक गुरुवारपासून मुंबईतील गणपती पाहण्यासाठी उपस्थिती लावतील. त्यांच्यासाठी चोख बंदोबस्त वाहतूक पोलिसांनी केला आहे. मुंबईतील संभाव्य गर्दीची ठिकाणे पाहता गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, बडा मस्जिद, वांद्रे, जुहू चौपाटी आणि गणेश घाट, पवई या शहरातील पाच प्रमुख विसर्जन स्थळांवर वाहतूक पोलिसांनी नियंत्रण कक्ष उभारले आहेत. सोबतच विसर्जनादरम्यान वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी ठिकठिकाणी पहाराही दिला जाणार आहे.
 

वाहतूक पोलिसांसह वाहतूक नियोजन करताना एक हजार स्वयंसेवकही असतील. सुमारे दोन हजार आठशे पोलिसांचा ताफा आगमनापासून पुढील दहा दिवस कार्यरत राहणार आहे. यात अनिरुद्ध एकेडमी डिझास्टर कंट्रोल, आरएसपी शिक्षक, सागरी सुरक्षा पथक, विद्यार्थी, स्काऊट-गाईड यांचा सहभाग असेल.

 

मुंबईतील रस्त्यांवर सुरू असलेली भाविकांची गर्दी पाहता दि. १३ सप्टेंबर (गुरूवार), १४ सप्टेंबर (शुक्रवार), १७ सप्टेंबर (सोमवार), १९ सप्टेंबर (बुधवार) आणि २३ सप्टेंबर (रविवार) या दिवशी रात्री १२.०० ते सायंकाळी ६.०० वाजेदरम्यान बदल करण्यात आले आहेत. आपत्कालीन नियंत्रणासाठी रुग्णवाहिका, प्रथमोपचार केंद्र सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच अपघातावेळी क्रेनही सज्ज ठेवण्यात आले आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@