‘संघासारखे काम कराल, तरच ओबीसींचा विकास’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Sep-2018
Total Views |

 
 
 
मुंबई: गेली अनेक वर्षे सेक्युलरीझमच्या नावावर मुस्लीम समाजावर अन्याय झाला आहे. इतर मागासवर्ग योगाला संविधानिक दर्जा मिळवून देण्यासाठी आम्हीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती, जी आमच्या सरकारने पूर्ण केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणे जेव्हा अविरत काम कराल तेव्हाच ओबीसी समाजाचा विकास होईल, असे उद्गार राज्याचे पशुपालन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले.
 

मुंबईतील मरीन लाईन्स येथे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनने आयोजित केलेल्या संविधान सम्मान संमेलनात बोलताना महादेव जानकर यांनी रा. स्व. संघाबाबत हे विधान केले. विशेष म्हणजे, यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हेही व्यासपीठावर उपस्थित होते. जानकर म्हणाले की, ओबीसी समाजाचा विकास करायचा असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणे अविरत कार्य केले पाहिजे. ओबीसी समाजाच्या विकासासाठी ओबीसी जनगणना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच सरकारच्या काळात होऊ शकते, असे सांगत जानकर यांनी यावेळी केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या कामाची प्रशंसा केली. देशाचे संविधानकोणालाही बदलता येणार नाही. मुस्लिम समाजासाठी मदरशांना आम्ही कौशल्य विकास योजनेमध्ये आणत आहोत. ओबीसी समाजाची जनगणना आमचे सरकारच करेल, असाविश्वासही जानकर यांनी यावेळी व्यक्त केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

@@AUTHORINFO_V1@@