सिंधुदुर्गात बाप्पांसह अवतरले पहिले विमान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Sep-2018
Total Views |

 


 
 
 
सिंधुदुर्ग : गेल्या काही काळापासून प्रतिक्षा असलेली गोष्ट आज अखेर घडली. सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळावर आज पहिले विमान अवतरले. चेन्नईहून उड्डाण झालेले हे १२ आसनी विमान आज चिपी विमानतळावर उतरले. विमानतळावर चाचणीसाठी हे विमान दाखल झाले. विशेष म्हणजे या विमानातून गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. या विमानातून आणलेल्या या गणपतीच्या मूर्तीची उद्या विमानतळावरच प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. दीड दिवसाने या मूर्तीचे विसर्जन होईल.
 

पुढील दोन महिन्यांनी सर्व परवानग्या मिळाल्यानंतर हे विमानतळ नागरिकांसाठी खुले होणार आहे. एक आंतरराष्ट्रीय विमानकंपनी आठवड्यातून ३ वेळा या विमानतळावर आपली विमानसेवा देणार आहे. तसेच युरोपातील अनेक चार्टर्ड विमानेही या चिपी विमानतळावर उतरणार असल्याचे सूत्रांनुसार कळते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@