अतिधोकादायक पुलांवर हातोडा पडणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Sep-2018
Total Views |
 
 

 

 

मुंबई : शहरातील १० अतिधोकादायक पूल व २ पदचारी पूलांवर महापालिकेचा हातोडा पडणार असून त्या ठिकाणी नवीन पूल बांधले जाणार आहेत. अंधेरीतील पदचारी पूलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक पूलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याच पार्श्वभूमीवर शहरातील पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट देखील करण्यात आले होते. त्यानुसार ३०४ पुलांपैकी ६१ पुलांच्या मोठ्या दुरुस्तीचे काम आवश्यक असल्याचे समोर आले होते.

 

स्ट्रक्चरल ऑडिटनुसार हे १० अतिधोकादायक पूल जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. हे अतिधोकादायक पूलांना जमीनदोस्त करताना व त्याचे पुनर्निर्माण करत असताना, शहरात मोठी वाहतूक कोंडी होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आले. यासाठी महापालिकेने पर्यायी व्यवस्था करावी अशी नागरिकांची मागणी आहे. दरम्यान, याशिवाय शहरातील १७८ पूलांची दुरुस्ती व ७७ पूलांची किरकोळ दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

 

अतिधोकादायक पूल

 
एसबीआय कॉलनी ब्रिज, दहिसर 
 
वाळभट ब्रिज, गोरेगाव
 
टेकडी कुरार व्हिलेज ब्रिज, मालाड
 
SCLR ब्रिज
 
बिहारी टेकडी ब्रिज, कांदिवली
 
इराणी वाडी ब्रिज, कांदिवली
 
SVP रोड ब्रिज, कांदिवली
 
आकुर्ली रोड ब्रिज, कांदिवली
 
हरी मस्जिद नूल्लाह ब्रिज, साकी नाका
 
चिराग नगर ब्रिज, घाटकोपर
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@