बाल नाट्य कार्यशाळेला होती फक्त ११ डोकी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2018
Total Views |
 
जळगाव, १० सप्टेंबर :
जिल्ह्यातील शाळांना शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी प्रस्ताव पाठवूनही शाळांच्या मुख्याध्यापकांनी निरुत्साही राहत एकदिवसीय नाट्य कार्यशाळेकडे पाठ फिरवल्याचे समजले. यावेळी केवळ ७ शाळांचे ११ शिक्षक उपस्थित राहिल्याने मुख्याध्यापक शिक्षण विभागाचे ऐकतात की नाही? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. आपल्या तोर्‍यात राहणार्‍या शाळांच्या शिक्षकांनी यावेळी भारत बंदचे कारण दाखवत शिक्षण विभागाच्या कार्यशाळेत येणे टाळले. दरम्यान, भुसावळ, अमळनेर येथील शिक्षक कार्यशाळेसाठी येऊ शकतात, मग बाकी का नाही, असा सवाल प्रशिक्षक वीणा लोकुर यांनी उपस्थित करत शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांना फोन करून संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी ४ तासांच्या कार्यशाळेसाठी केवळ दीड तास प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेऊन नाराजी व्यक्त केली. दरम्यान, शहरात १३० शाळा असताना केवळ ११ शिक्षक उपस्थित राहिल्याने शाळांची उदासीनता आणि मुख्याध्यापकांचा मुजोरपणा समोर आल्याचे दिसले. न आलेल्या शाळांवर कार्यवाही करावी, असे वीणा लोकुर यांनी सांगितले.
 
 
 https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
@@AUTHORINFO_V1@@