गणेशोत्सवानिमित्त रेल्वेची विशेष सोय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2018
Total Views |

 

 
मुंबई : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने एक विशेष सोय केली आहे. कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांना ज्यादा जबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून सोडलेल्या चार गणपती स्पेशल गाडय़ांना प्रत्येकी तीन अनारक्षित द्वितीय श्रेणीचे डबे जोडण्यात येणार आहेत. ट्विटरद्वारे मध्य रेल्वेने याबाबत माहिती दिली. कोकण रेल्वेने यंदा दोनशेहून अधिक गाड्या गणपतीसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ११ आणि १८ सप्टेंबर २०१८ रोजी सुटणारी क्र. ०१०९५ गाडी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड विशेष गाडी, १२ आणि १९ सप्टेंबर २०१८ रोजी सुटणारी परतीच्या प्रवासासाची ट्रेन क्र. ०१०९६ सावंतवाडी रोड ते लोकमान्य टिळक टर्मिनस, १३ आणि १५ सप्टेंबर रोजी सुटणारी ट्रेन क्र. ०११०३ लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड विशेष, १४ आणि १६ सप्टेंबर रोजी सुटणारी ट्रेन क्र. ०११०४ सावंतवाडी रोड ते लोकमान्य टिळक टर्मिनस या गाड्यांचा समावेश आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@