तांबापुर्‍यातील संशयित आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2018
Total Views |

तांबापुरात तणावपूर्ण शांतता कायम 

 
 
 https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
जळगाव, १० सप्टेंबर
शहरातील तांबापुरा परिसरात अशोक उर्फ रिकी हटकर याने दारूच्या नशेत महिलेला धक्का मारल्याच्या कारणावरून दोन गटात जोरदार हाणमारी होऊन दगडफेक झाल्याची घटना ऱविवार, रात्री १० वाजेच्या सुमारात घडली होती. याप्रकरणी दोन्ही गटातील ४८ संशयितांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेक करणार्‍यांना ताब्यात घेण्यासाठी दिवसभर पोलिसांची धरपकड मोहिम सुरू होती. संशयितांना न्यायालयात हजर केले असता, १७ संशयित आरोपींना ७ दिवसांची पोलीस तर ५ संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सोमवारीही पोलीस बंदोबस्त कायम होता तर परिसरात तणावपूर्ण शांतता होती.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात पोलीस कर्मचारी परीष जाधव यांच्या फिर्यादीवरून अशोक उर्फ विक्की हटकर, मोहंमद शेख अब्दुल, जमिल खान अब्बास खान, शेख फयाज शेख समसूद, रिजवान शेख युनुस, किरण रमेश तोतरे, इमरान शेख हरून, शेख हरून शेख हुसेन, शेख अशपाक शेख मुस्तफा, शफिक अहमद अब्दुल रहेमान, बबलू शेख उस्मान, रवींद्र अर्जून हटकर, किशोर भागवत हटकर, सुरेश भिका हटकर, विलास नथ्थू हटकर, हनीफ उर्फ हमीद लतीफ खाटीक, सब्बांनी मोहंमद अन्सारी रा. सर्व मच्छीबाजार, गवळीवाडा या १७ जणांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी तर शेख रोशन उस्मान याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
 
मच्छीबाजार, गवळीवाड्यातील अशोक उर्फ रिकी हटकर याने दारूच्या नशेत महिलेला धक्का मारल्याने रात्री दोन गटात जोरदार हाणामारी होऊन दगडफेक झाली होती. या दगडफेकीत दोन तरुणांसह बालक व पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या घटनेमुळे रविवारी रात्री परिसरात तणाव निर्माण झाला होता. 
 
 
https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
 
@@AUTHORINFO_V1@@