'अलीबाबा'चा अधिभार झांग यांच्या खांद्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2018
Total Views |




 


बीजिंग: ई. कॉमर्स क्षेत्रातील चीनमधील सर्वात मोठी कंपनी म्हणजे 'अलीबाबा'. याचे संस्थापक जॅक मा यांनी निवृत्ती घेतल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून डॅनियल झांग यांच्या नावाची घोषणा केली आहे. कंपनीच्या नेतृत्वाबद्दलची प्रक्रिया सुरळीत व्हावी म्हणून जॅक मा हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुढील वर्षभर तरी कार्यरत राहतील. २०२० पर्यंत ते संचालक पदी कार्यरत राहणार आहेत.

 

जॅक मा यांनी निवृत्तीची घोषणा शनिवारी केल्यानंतर सोमवारी त्याच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा ते करणार होते अशी माहिती त्यांनी यापूर्वी दिली होती. सांगितल्याप्रमाणे आपल्या ५४व्या वाढदिवशी त्यांनी डॅनियल झांग यांची घोषणा केली. त्यांनी 'अलीबाबा' च्या सर्व कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी ही माहिती लिहली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@