सिद्धिविनायक मंदिराच्या पोस्टल स्टॅम्पचे अनावरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2018
Total Views |


 
मुंबई : भारतीय पोस्ट विभागातर्फे दादरच्या सिद्धिविनायक मंदिराचा पोस्टल स्टॅम्प तयार करण्यात आला आहे. या स्टॅम्पच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “मी आणि उद्धव ठाकरे यांनी सिद्धिविनायकाकडे राज्यावरील संकटे दूर व्हावीत, अशी प्रार्थना केली आहे.”

हा पोस्टल स्टॅम्प सर्वांच्या घरी शुभवार्ता घेऊन जावो. गणेश चतूर्थीच्या पूर्वीच सिद्धिविनायक मंदिराच्या पोस्टल स्टॅम्पचे अनावरणाची संधी दिल्याबद्दल त्यांनी पोस्ट विभागाचे आणि श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट न्यासचे आभार मानले. यावेळी श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकरही उपस्थित होते.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@