‘पुन्हा ‘मोदी’च, का...?’ भाऊ तोरसेकर यांची मुलाखत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2018
Total Views |

 

 

ठाणे : ठाण्याचे वैशिष्ट्य असलेल्या राष्ट्रीय विचारांचा हिंदू जागृती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे अठ्ठावीसावे वर्ष आहे. राष्ट्रीयदृष्ट्या संवेदनशील, सामाजिकदृष्ट्या महत्वाच्या विषयांवर सजावट हे या मंडळाचे वेगळेपण आहे. दि. १९ सप्टेंबर रोजी मंडळाने यंदा २०१९ मध्ये पुन्हा मोदीच का या विषयावर ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांची मुलाखत आयोजित केली आहे. पत्रकार, दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे कार्यवाह मकरंद मुळे हे ही मुलाखत घेतील.
 

एनआरसीच्या पार्श्वभूमीवर “घुसखोरीचे आव्हान” या मुद्यावर मंडळाने सजावट केली आहे. १३ सप्टेंबरपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. सजावटीच्या संहितेचे लेखन पत्रकार मकरंद मुळे यांनी केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाची सजावट आकर्षक, माहितीपूर्ण करण्यात आली आहे. यंदा महिलांचे सामुहिक अथर्वशीर्ष पठण, गणेशयाग होणार आहे. दि. १५ व दि. १६ सप्टेंबर रोजी नृत्य गणेश कला साधक स्पर्धा होणार आहे. दि. २० सप्टेंबर रोजी मराठी वाद्यवृंद व दि. २१ सप्टेंबर रोजी तबला वादक फजल कुरेशी, बासरी वादक विवेक सोनार यांचा कार्यक्रम होणार आहे. दि. २२ सप्टेंबर रोजी चारुदत्त आफळे यांचे कीर्तन होईल. सर्व नियोजित कार्यक्रम सहयोग मंदिर सभागृह येथे रात्री नऊ वाजता होतील. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, प्रवेश विनामूल्य आहे.

 
दि. २३ अनंत चतुर्दशीच्या दिवशी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक निघेल. यावेळी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवहन मंडळाचे प्रमुख सल्लागार नगरसेवक सुनेश जोशी, कार्यक्रम प्रमुख विकास घांग्रेकर, आणि हिंदू जागृती न्यासाचे अध्यक्ष मंगेश ओक यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@