उड्डाणपुलांवर ध्वनिरोधक यंत्रणा बसविणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2018
Total Views |


 


मुंबई : मुंबईत मोठमोठे उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. परंतु, काही उड्डाणपुलांवर ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबतची ठरावाची सूचना ‘पी’ दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष संदीप पटेल यांनी मांडली होती. तिला सभागृहाची मंजुरी मिळाली असून हा प्रस्ताव आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठविला जाणार आहे. त्यांच्या सकारात्मक अभिप्रायानंतर या प्रस्तावाची अंमलबजावणी केली जाणार आहे. पटेल यांनी आपल्या ठरावाच्या सूचनेत म्हटले होते की, मुंबई शहर आणि उपनगरात मोठमोठे उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. परंतु, काही उड्डाणपुलांवर ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात आलेली नाही.

 

बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल, वीर सावरकर उड्डाणपूल, मृणालताई उड्डाणपूल यांच्यावर ध्वनिरोधक यंत्रणा नाही. या पुलांवरील विविध वाहनांच्या वर्दळीमुळे येथील इमारतीतील नागरिकांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. ध्वनिप्रदूषणावर मात करण्यासाठी महापालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलांवर ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी पटेल यांनी केली आहे. तसेच यापुढे बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांच्या निविदांमध्ये ध्वनिरोधक यंत्रणा बसविणे बंधनकारक करण्यात यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@