सुरेखा लोखंडे यांच्यामुळे रुग्णांना दिलासा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2018
Total Views |


  

 

 

मुंबई : नायर रुग्णालयातील रुग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. भाजप नगरसेविका सुरेखा लोखंडे यांनी याबाबत पुढाकार घेऊन रुग्णालय प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. नायर रुग्णालयामध्ये नियोजनाचा अभाव होता. नगरसेविका सुरेखा लोखंडे, रोहिदास लोखंडे आणि कार्यकर्ते यांनी सलग चार दिवस नायर रुग्णालयात जाऊन रुग्णांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यावर नायरचे अधिष्ठाता आणि डॉक्टर यांच्यासोबत चर्चा करून १० रुपयांची पावती आणि केसपेपर एकाच खिड़कीवर मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यासोबत नायर रुग्णालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक तसेच महिला रुग्ण यांना सुरक्षारक्षक यांनी मदत करावी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना योग्य ठिकाणी जाण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचना यांनी केल्या होत्या.
 
 

नागरिकांना केसपेपर आणि पावती मिळण्यासाठी दोनवेळा रांग लावावी लागत होती. परंतु आता प्रत्येक खिडक्यांवर एकाच वेळेस १० रुपये भरलेल्याची पावती व केस पेपर मिळणार आहे, तर महिलांसाठी दोन स्वतंत्र नोंदणी खिडक्यांची व्यवस्था करण्यात आली. पुरुषांसाठी स्वतंत्र दोन खिडक्यांची व्यवस्था करण्यात आली. तसेच अंध-अपंग, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिकांकरिता स्वतंत्र खिडकीची व्यवस्था करण्यात आली. तसेच माहितीसाठी चौकशी खिडकी उपलब्ध करून देण्यात आली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@