दादरच्या इंद्रवदन गणेशोत्सव मंडळाचा अनोखा उपक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2018
Total Views |

 

 
 
 
मुंबई : दादर येथील इंद्रवदन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ओला कचरा खत प्रकल्प राबविण्यास प्रारंभ केला आहे. हा प्रकल्प सुरु करून या मंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आवाहनास प्रतिसाद दिला आहे. इंद्रवदन गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे हे शतकमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने हा सामाजिक बांधिलकी जपणारा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
 

इंद्रवदन सोसायटी कसा राबवते हा प्रकल्प?

 

दादर येथे असलेल्या या सोसायटीत १५० हून अधिक कुटुंबे राहतात. या घरांमधील कचऱ्याचे वर्गीकरण करुन ओला व सुका कचरा वेगळा करूनच एकत्र जमा केला जातो. त्यानंतर त्याच्यातील प्लॅस्टिक, रबर इत्यादी अजैविक कचरा वेगळा केला जातो. तरीही कचरा राहून गेला असल्यास तो मशीनमधून बारीक केला जातो. त्यानंतर तो कम्पोस्ट पिट्स मध्ये टाकला जातो. त्यावर विरजण टाकून भुश्याने ते झाकले जाते. अशाप्रकारे दर १५ दिवसांनी हे पिट्स भरले जाता. नंतर लोडिंग थांबवून कचरा कंपोस्ट केला जातो आणि महिन्याच्या शेवटी कच-याचे खतात रुपांतर होते. त्यानंतर ते पिट्समधून काढून एक दोन दिवस उन्हात वाळवून चाळले जाते. त्यानंतर पॅक करून साठविण्यात येते. या कंपोस्ट खताचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो.

 
 

 

सामाजिक बांधिलकी म्हणून राबविण्यात येत असलेला हा प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रमाणित केला आहे. इंद्रवदन गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने यापूर्वीही विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. पानशेत धरणग्रस्तांना मदत, दुष्काळग्रस्तांना सहकार्य, युद्धाच्या काळात मदतकार्य अशा अनेक प्रकारे या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. अशी माहिती इंद्रवदन सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रविंद्र आवटी यांनी दिली.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@