पालिका रुग्णालयांमध्ये होणार मोबाईल चार्जिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2018
Total Views |


 


मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्ण व त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांच्या मोबाईलची बॅटरी संपते. त्यांना संपर्क साधता येत नाही, मदत मिळविता येत नाही. परंतु रुग्ण आणि नातेवाईकांना दिलासा मिळणार असून आता पालिकेच्या रुग्णालयात चार्जिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. याबाबतची ठरावाची सूचना भाजपचे नगरसेवक जगदिश ओझा यांनी मांडली होती. तिला सभागृहाची मंजुरी मिळाली असून हा प्रस्ताव आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठविला जाणार आहे. त्यांच्या सकारात्मक अभिप्रायानंतर या प्रस्तावाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

 

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक उपचार मिळत असल्यामुळे देशाच्या विविध भागांतून लोक उपचारासाठी येथे येतात. आंतररुग्ण विभागातील रुग्णास काही काळ वास्तव्य करावे लागते, तर बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांना विविध चाचण्यांसाठी पूर्ण दिवस थांबावे लागते. यावेळी नातेवाईक आणि रुग्ण यांचे संपर्काचे साधन असलेल्या मोबाईलचे चार्जिंग संपते. पालिका रुग्णालयांमध्ये मोबाईल चार्जिंगची व्यवस्था नसल्याने रुग्ण आणि नातेवाईक यांना संपर्क साधता येत नाही. आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळविता येत नाही. मोबाईलची चार्जिंग करण्यासाठी पालिका रुग्णालयात सुविधा नसल्याने रुग्ण आणि नातेवाईकांना रुग्णालयाबाहेर जावे लागते. बाहेर मोबाबईल चार्जिंगसाठी जास्त पैसे आकारले जातात. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयात चार्जिंगची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी ओझा यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली.

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
@@AUTHORINFO_V1@@