नव मतदारांसाठी महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा डिजिटल प्रचार...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2018
Total Views |
 
 
 
 
२०१९ च्या निवडणुकांसाठी संपूर्ण देश तयारी करत आहे. महाराष्ट्रात तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका २०१९ मध्येच पार पडणार आहेत. आगामी निवडणुकांमध्ये लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून पक्षाच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा पुरेपुर वापर होत आहे. सोशल मीडियाच्या या प्रचारवारीत महाराष्ट्र निवडणूक आयोगही आपली छाप पाडत आहे. या सोशल मीडियाच्या प्रचारवारीत महाराष्ट्र निवडणूक आयोग कुठल्या पक्षाचा नव्हे तर नागरिकांमध्ये नाव नोंदणी करण्याचा संदेश पोहोचवत आहे.
 
 
या सोशल मीडिया मोहिमेचे मुख्य लक्ष हा तरुण वर्ग आहे. आगामी निवडणुकीत वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली तरुण मंडळी पहिल्यांदाच मतदाराची भूमिका बजावणार आहेत. देशाच्या या भावी नागरिकांना म्हणजे तरुण पिढीला मतदार नाव नोंदणी आणि मतदानाचे महत्त्व समजावे म्हणून महाराष्ट्र निवडणूक आयोगानेसोशल मीडिया कॅम्पेन्सराबवण्यास सुरुवात केली आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्युब यांसारख्या सोशल मीडियावर तरुणाईचा सतत वावर असणाऱ्या सोशल मीडियांचा वापर महाराष्ट्र निवडणूक आयोगाने तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी केला आहे. मतदार नोंदणी आता ऑफलाईनप्रमाणेच ऑनलाईन (www.nvsp.in) देखील होऊ शकते याची माहिती देणारे हे सोशल मीडिया उपक्रम आहे.
 
 

 
 
 
चित्रपटांचे डायलॉग्ज, फिफा २०१८ वर्ल्ड कप, बिग बॉस, पावसाळा, फ्रेंडशिप डे, स्वातंत्र्य दिन यांसारखे तरुणांच्या मनाला भावणारे अनेक विषय आणि मतदार नाव नोंदणी यांचा सुरेख मेळ या सोशल मीडिया मोहिमेत मांडण्यात आला आहे. या उपक्रमांच्या अनुसार असे दिसून येते की तरुणांमध्ये महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या या सोशल मीडिया मोहिमेची फारच चर्चा आहे. चित्रपटांचे डायलॉग्ज तरुणाईला आवडतात, त्याच आधारावर महाराष्ट्र निवडणूक आयोगानेही मराठी, बॉलिवूड आणि हॉलिवूड मधील चर्चित चित्रपटांच्या डायलॉग्जचा वापर आपल्या सोशल मीडिया मोहिमेत केला आहे.
 
 


 
 
यावर्षी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या फिफा २०१८ वर्ल्ड कप या विषयाचा समावेशही निवडणूक आयोगाने त्यांच्या सोशल मीडिया मोहिमेत केला आहे. फुटबॉलशी निगडीत गोष्टींना मतदान नाव नोंदणी प्रक्रियेशी सुयोग्यरीत्या जोडून पोस्टर कॅम्पेन्स बनवले आहेत.
 
 


 
 
या वर्षी बहुचर्चित ठरलेल्या बिग बॉस मराठी कार्यक्रमावर आधारित ही मतदार नाव नोंदणी सोशल मीडिया कॅम्पेन्स महाराष्ट्र निवडणूक आयोगाने तयार केले आहेत. या शो प्रमाणेच हे पोस्टर्स देखील हटके आहेत. स्वातंत्र्य दिन विशेष मोहिमेत निवडणूक आयोगाने तरुणांना मतदार नाव नोंदणी आणि स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून देणारे पोस्टर्स तयार केले आहेत.
 
 
 
 
 
 
त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्यात तरुणाईकडून मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणारा फ्रेंडशिप डे,यावर देखील सोशल मीडिया मोहिम राबवण्यात आली होती. आपल्या मित्रांना मतदार बनवा, टॅग चॅलेंज यांसारख्या नविन कल्पना या मोहिमेतून साकरण्यात आल्या होत्या.
 
 
 
 
 
 
महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडून सादर करण्यात आलेली वेगवेगळ्या विषयांवरील सोशल मीडिया पोस्टर मोहिम हिट तर ठरतेच आहे, यासोबतच तरुणांमध्ये चर्चा रंगते आहे त्यांच्या व्हिडिओ मोहिमेची. ही व्हिडीओ मोहिम महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या युट्युब अकाऊंटवर प्रदर्शित करण्यात आली आहे.
 
 

 
 
मतदार नाव नोंदणी प्रक्रियेबाबत नागरिकांना महत्त्व पटवून देण्यासाठी महाराष्ट्र निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबविल्या आहेत. नागरिकांमध्ये मतदार नाव नोंदणी प्रक्रियेबद्दल अधिक प्रमाणात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र) च्या वतीने दि. १ सप्टेंबर ते दि. ३१ ऑक्टोबर २०१८ या कालावधीतमतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत नागरिकांना मतदार यादीतील आपले नाव तपासणे, नवीन नाव नोंदणी अथवा असलेल्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्याबाबत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. या कालावधीमध्ये प्राप्त झालेल्या दावे व हरकतींवर निर्णय घेऊन अंतिम मतदार यादी ही ४ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
 

 
 
महाराष्ट्र निवडणूक आयोगाने याआधी ही मतदार नाव नोंदणी मोहिम केली आहे पण यावेळेस केल्या गेलेल्या सोशल मीडिया कॅम्पेन्सचा प्रभाव उत्तम असून नागरिकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
 
 
महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे सोशल मीडिया कॅम्पेन्स पाहण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा आणि फॉलो करा.
 
 
 
 
 
 
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/Ceo_Maharashtra
 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@