ठाण्यातील खड्डे बुजविण्याचे काम अंतीम टप्प्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2018
Total Views |


 
 
 
 
 

मध्यरात्रीही पालिका यंत्रणा ऑन ड्युटी


ठाणे : ठाण्यातील खड्डे बुजवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून पालिकेची सर्वच यंत्रणा दिवसरात्र कामाला लागल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळत आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या रात्रीच्या गस्तीमुळे खड्डे बुजविण्याची ही मोहीम अधिक गतीमान झाली असल्याने वाहतूक कोंडी फुटण्यास मदत झाली आहे.

 

दरम्यान शुक्रवारी रात्रीही महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यानी संपूर्ण शहरात सुरू असलेल्या कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांच्या चे बळ वाढविले. यावेळी त्यांच्यासमवेत सभागृह नेते नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, नगरसेवक संतोष वडवले, सुधीर कोकाटे, योगेश जाणकर आणि सिद्धार्थ ओवळेकर आदी उपस्थित होते. पहाटे 3 वाजेपर्यंत ही पाहणी सुरू होती. शहरातील वाहतुककोंड सोडवण्यासाठी रस्त्याची मालकी न तपासता गेल्या चार रात्री महापालिकेची संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरून खड्डे बुजविण्याचे काम करीत आहे. विविध अधिकाऱ्यांच्या विशेष पथकांच्या निगराणीखाली वाहतूक पोलिसांच्या समन्वयातून पहाटे चार-चार वाजेपर्यंत हे काम सुरू आहे. मुख्य रस्त्यांबरोबरच शहराच्या आतील भागातील रस्त्यांचे खड्डे बुजविण्याचे कामही प्रगतीपथावर आहे.

 

शुक्रवारी शहरात संजयनगर, मुंब्रा, दातिवली रोड, दिवा याबरोबरच शहरात गुरूद्वारा, मुख्य पोस्ट कार्यालय, एमएच हायस्कूल, यशोधन नगर, वीर सावरकर नगर, लोकमान्य नगर आणि ओवळा या ठिकाणी काम सुरू होते. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पहाटे तीन वाजेपर्यंत गुरूद्वारा, मुख्य पोस्ट कार्यालय, एमएच हायस्कूल, यशोधन नगर, वीर सावरकर नगर, लोकमान्य नगर आणि ओवळा या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@