स्वामी प्रतिष्ठानची देशातील सर्वात मोठी दहीहंडी ठाण्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2018
Total Views |


 
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार


ठाणे: मराठी संस्कृतीचे जतन करताना दहीहंडी उत्सवाला ग्लोबल मान्यता मिळवून देणाऱ्या ठाणे नगरीत आता भारतीय जनता माथाडी, जनरल कामगार संघाचे अध्यक्ष व स्वामी प्रतिष्ठानचे शिवाजी पाटील यांच्या दहिहंडीने नवे आयाम देण्याचा प्रयत्न केले आहे. 10 थरांसाठी 25 लाख रुपयांचे भरघोस बक्षीस ठेवण्यात आले असून पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वामी प्रतिष्ठानच्या सामाजिक समरसता दहीहंडी उत्सवात गोविंदाचे मनोबल वाढविण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

 

ठाणे येथील हिरानंदानी मिडोज चौक, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्ययगृहासमोर स्वामी प्रतिष्ठानतर्फे सर्व नियमांचे पालन करून पहिल्यांदा दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवाची तयारी पाहून ठाणेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून दहीदांडीची चर्चा सुरु झाली आहे. दहीहंडीच्या उत्सवात पहिल्यादा शिवाजी पाटील यांच्या रूपाने विक्रमी बक्षिसाची दहीहंडी उभारण्यात येणार असून ही हंडी सामाजिक समरसतेप्रमाणे भारतरत्न दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहणारी असेल. मराठमोळ्या संस्कृतीचे जतन, प्रचार करताना सामाजिक बांधिलकीचे भान जपण्याचे प्रयत्न दहीहंडी उत्सवातून केले जाणार आहे. तसेच याचवेळी केरळमधील पुरग्रस्तांना आणि आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेशदेखील मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला जाणार आहे. मुंबईतील सर्व गोविंदा पथकांना आमंत्रित करण्यात आले असून त्यांचा विमा काढण्यात येणार आहे. दहा थर लावणाऱ्या गोविदा पथकाला 25 लाख तर 9 थर लागल्यास 11 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. महिलांसाठी आणि ठाणेकर गोविदा पथकासाठी स्वतंत्र बक्षीस ठेवण्यात आली.

 

राजकारणातल्या दिग्गजांची उपस्थिती

 

ठाण्यातील या दहिहंडीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून गोविंदांचा उत्साह वाढविणार आहेत. त्यांच्या प्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खा. विनय सहस्रबुद्धे, खा. कपिल पाटील, भाजप मुंबई अध्यक्ष आ. अ‍ॅड. आशिष शेलार, सल्लागार तथा मुंबई महापालिकेतील गटनेते मनोज कोटक, आ. नरेंद्र पवार, आ. प्रसाद लाड, आ. मंगलप्रभात लोढा, आ. गणपत गायकवाड, आ. प्रशांत ठाकूर, आ. किसन कथोरे, आ. निरंजन डावखरे, आ. महेश चौगुले, आ. नरेंद्र मेहता, आ. प्रवीण दरेकर, आ. रमेश पाटील, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा माधवी नाईक, भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी, प्रवक्ते प्रेमजी शुक्ल, ठामपा गटनेते मिलिंद पाटणकर, सरचिटणीस मुकेश मोकाशी हेदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती पाटील यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@