शांतता क्षेत्रे कागदावरच....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2018
Total Views |


 

डोंबिवली (रोशनी खोत) : कल्याण डोंबिवली परिसराला वायू आणि जल प्रदुषणाचा विळखा पडलेला असताना वाढते ध्वनी प्रदूषणदेखील एक गभीर समस्या बनली आहे. सबंधित यंत्रणेकडून शांतता क्षेत्राचे फलक लावले जात असले तरी ध्वनी प्रदुषणाच्या पातळीत कोणताही फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी फलक गायब झाल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेकडून घोषित केले जाणरे शांतता क्षेत्र केवळ नावाचे शांतता क्षेत्र ठरत आहेत.

 

सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ध्वनी प्रदूषण ही गभीर समस्या आहे. वाढते औद्योगिकीकरण, तंत्रज्ञान आणि यंत्र सामग्री समाज जीवनात आधुनिकता आणत असली तरी यांचा ध्वनी प्रदुषणास मोठा हातभार लागत आहे. वने व पर्यावरण विभागातर्फे ध्वनी प्रदुषणासबंधी, विविध जागेसाठी आणि विविध वेळासाठी आवाजाच्या किमान मर्यादा निर्देशित केल्या आहेत. यात औद्योगिक केंद्र, व्यापारी केंद्र , रहिवाशी क्षेत्र आणि शांतता क्षेत्र याचा समावेश होता. शांतता क्षेत्राचा विचार करता आवजाची कमाल मर्यादा दिवसा 50 डेसिबल तर रात्री कमाल मर्यादा 40 डेसिबल असावी. मात्र, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राचा विचार करता हे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे स्पष्ट होते. यंदाचा पर्यावरण सध्यस्थिती अहवाल महापलिकेकडून आतापर्यंत जाहीर करण्यात आला नाही . 2016-17 च्या आहवालात घालून दिलेल्या डेसिबल नियमांचे उलंघन होत असल्याचे दिसते. या अहवाला नुसार महापालिका क्षेत्रात 14 शांतता क्षेत्रे आहेत. रुग्णालय, शैक्षणिक संस्था आणि न्यायालये यासारख्या संस्थांचा सभोवतालचा सुमारे 100 मीटर पर्यतचा परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित केला जातो. मात्र, वाढती वाहनसंख्या आणि होणारी कोंडी यात जी क्षेत्र गोंगाटाची क्षेत्र म्हणून अनुभवास येत आहे. रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण जिल्हा सत्र न्यायलय, बिर्ला महाविद्यालय, केसी गांधी महाविद्यालय, शारदा विद्यामंदिर, महेंद्रसिंग काबुलसिंग महाविद्यालय, शास्त्रीनगर रुग्णालय, जोंधळे महाविद्यालय, हिंदी हायस्कूल, अग्रवाल महाविद्यालय, डॉ राजेंद्र प्रसाद शाळा ठाकुर्ली आधारवाडी चौक परिसरचोळेगावातील गावदेवी व मारुतीमदिर परिसर, व्ही, पी रोड, नेहरू मैदान प्रिमायसेस, आणि महापालिका शाळा नंबर 40 आदींचा शांतता क्षेत्र म्हणून उलेख आहे.

 

या शांतता क्षेत्राचा आढावा घेता बहुतांश ठिकाणी फलक ही लावण्यात आलेले नाही. पर्यावरण अहवालात जे निकष नोंदविण्यात आले आहेत ते देखील वास्तव मांडणारे आहेत. ध्वनी प्रदूषण पातळी शांतता क्षेत्रामध्ये विहित मर्यादेपेक्षा दिवसा आणि रात्री जास्त आढळून आले. तसेच महापालिका क्षेत्रातील इतरही ठिकाणी म्हणजेच निवासी, व्यवसायिक, औद्योगिक ठिकाणीही विहित मर्यादेपेक्षा जास्त आढळून आल्याचे मत नोंदविले गेले आहे. यावर काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. पालिका क्षेत्रातील शाळा, कॉलेज, हॉस्पिटल अशा ठिकाणी नो हॉर्नचे बोर्ड लावणे, तसेच काही खाजगी ठिकाणी फेरीवाला मनाई क्षेत्र असे बोर्ड लावावेत, तसेच काही खाजगी ठिकाणी फेरीवाला मनाई क्षेत्र असे बोर्ड लावावेत, तसेच नियमांचे उल्लघन झाल्यास सक्त कारवाई करावी, द. नोईस पॉलुशन (रेगुलेशन अँड कंट्रोल) नियमन 2000 च्या नुसार बांधकाम करताना आवश्यक त्या यंत्र सामुग्रीचा वेळोवेळी तपासणी करावी, जेणेकरून त्यामुळे होणारा आवाज आटोक्यात राहील, उत्सवात, लग्न कार्यात बँडच्या आवजावर तसेच कोणत्याही स्पीकरच्या आवाजावर मर्यादा असावी अन्यथा कडक करावाई करावी, याच बरोबर रहिवासी क्षेत्रे आणि औद्योगिक क्षेत्रे या ठिकाणी महापालिकेतर्फे ध्वनी प्रदुषणाची चाचणी करण्यास बंधनकारक करण्यात आले आहे.

 

आवजाची कमाल मर्यादा घालून दिली असली तरी ही आवजाची पातळी 55 ते 61 डेसिबल्सपर्यंत वाढल्याचे दिसते. तर उत्सव काळात ही पातळी 72 ते 100 डेसिबल्सपर्यंत वाढल्याची नोंद गतवर्षीच्या अहवालात करण्यात आली आहे. दरवर्षी अहवाल प्रकाशित होतात. त्याचे वास्तवही मांडले जाते आणि सूचनाही केल्या जातात. मात्र कोणतीही कृती या प्रकरणी होत नसल्याने हे अहवाल आणि त्यात मांडल्या जाणाऱ्या नोंदी एक प्रकारे ठोक ताळे ठरत आहेत. दरम्यान, या संदर्भातील माहितीसाठी आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी सपर्क साधला असता त्यांच्याकडून या गोष्टीची माहिती घेत कारवाई करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@