रावेर येथील प्रवाशांच्या सोयीसाठी सुरत पॅसेंजरच्या वेळेत बदल - खा . रक्षा खडसे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2018
Total Views |
 
 

रावेर येथील प्रवाशांच्या सोयीसाठी सुरत पॅसेंजरच्या वेळेत बदल -  खा . रक्षा खडसे 

· भुसावळ , २ सप्टेंबर
 रावेर येथून भुसावळ - जळगाव कडे कामकाजानिमित्त ये - जा करणा-या प्रवाशांची होणारी गैरसोय दुर व्हावी यासाठी रेल्वे स्थानकावरुन सुटणा-या सुरत पॅसेंजर गाडीच्या वेळेत २ सप्टेंबर पासुन बदल करण्यात येईल अशी माहिती खा.रक्षा खडसे यांनी  माहिती  दिली.
 
अनेक  नागरिक नोकरीनिमित्त व अन्य महत्वपुर्ण कामकाजासाठी भुसावळ व जळगाव येथे ये - जा करीत असतात. रावेरहुन भुसावळला येणारी इटारसी पॅसेंजर विविध कारणांमुळे उशीरा भुसावळ रेल्वेस्थानकावर घेतली जाते. त्यामुळे सकाळी ८.४५ वाजता सुटणारी भुसावळ - सुरत पॅसेंजर निघुन जात असल्याने हजारो प्रवाशाना  याचा त्रास होत होता म्हणून खा. खडसे यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्यामुळे  १ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अप्पर विभागीय रेलवे प्रबंधक मनोज सिन्हा यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
 
    बैठकीत इटारसी पॅसेंजर व ई - निविदा प्रक्रियेबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेनुसार इटारसी पॅसेंजरला शक्य तेवढया लवकर भुसावळ स्थानकात ८.३५ पर्यंत आणून स्थगित करावी मगच भुसावळ सुरत पॅसेंजरला सोडण्यात यावे किंवा इटारसी पॅसेंजरचे आगमन झाल्यावरच सुरत पॅसेंजर रवाना करावी व हा निर्णय २ सप्टेंबरपासून प्राधान्याने अंमलात आणला जाईल असे रेल्वे प्रशासनाद्वारे निश्चित करण्यात आले.
भुसावळ विभागामध्ये सदध्या सुरु असलेल्या विविध कामांसाठी ई - निविदा प्रक्रियेद्वारे कामाचे वाटप झाले आहे. मात्र या कामाच्या वाटपात दिशानिर्देशानुसार कार्य सुरु नसल्याचे दिसुन आले आहे. रेल्वेने ठरवून दिलेल्या दिशानिर्देशानुसार निविदा प्रक्रियेचे वाटप करावे अन्यथा याबाबत थेट संसदेमध्ये प्रश्न मांडला जाईल अथवा रेल्वे मंडळाकडे तक्रार करण्यात येवून संंबंधित वाटप प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी नाईलाजाने करावी लागेल असे खा. खडसे यांनी सांगितले.
   या  बैठकीला वरिष्ठ मंडळ परिचालन अधिकारी स्वप्नील निला, वरिष्ठ मंडळ संरक्षा अधिकारी कुलविंदरसिंग सियाली,वरिष्ठ मंडळ विदयुत अभियंता टिआरडी पी.व्ही.ओक, रेल कामगार सेनेचे मंडळ सचिव राजेश लखोटे,भुसावळ विभागीय रेल्वे उपभोक्ता समितीचे सदस्य अनिकेत पाटील,सुयश न्याती, भाजयुमोचे उपाध्यक्ष सुमित ब-हाटे आदी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@