शौचालय नसल्यामुळे महिलांची हेळसांड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2018
Total Views |


 

शासनाच्या हगणदारीमुक्त अभियानाला हरताळ
 

उल्हासनगर : येथील गांधीनगर परिसरात नादुरुस्त शौचालयामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे विशेषतः महिलांची कुचंबणा होत आहे .शासनाच्या "हगणदारी मुक्त" आणि "स्वच्छ भारत अभियानचा” उघड उघड लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून खिल्ली उडवली जात असल्याचा आरोप मातंग संघर्ष समितीने केला आहे.

 

उल्हासनगर- २ येथील प्रभाग क्रमांक ७ मध्ये खेमानी रोड , गांधीनगर परिसरात महानगरपालिकेने १० लाख रुपये खर्च करून १० सीटर शौचालय बनविले होते . २०१६ -१७ मध्ये या शौचालयचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आणि सार्वत्रिक निवडणूकीच्या अगोदर त्याचे उद्घाटन करण्यात आले . काही दिवस नागरिकांनी या शौचालयाचा वापर केला मात्र काही दिवसानंतर हे शौचालय तुंबू लागले. सांडपाणी आणि घाण शौचालयाभोवती जमू लागली. शौचालयाचे आऊटलेड तांत्रिकसृष्ट्या अयोग्य पद्धतीने बांधल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिक आणि मातंग संघर्ष समितीने मनपाकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले . सध्या दुरूस्ती अभावी या शौचालयाची दुरावस्था झाली आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांना दूरच्या ठिकाणी असलेल्या शौचालयास जावे लागते. विशेषतः महिला वर्गाची कुचंबणा होत आहे.

 

याच परीसरात लाखो रुपये खर्च करून समाजमंदिर बनविण्यात आलेले आहे या समाजमंदिराला देखील गळती लागली आहे . यामुळे तेथे बसणे देखील अवघड झाले आहे . या समाजमंदिर मध्ये सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. काही वेळा गोरगरीब रहिवाशी येथे लग्न अथवा साखरपुडा असे कार्यक्रम देखील करतात . स्थानिक लहान मुलांसाठी येथे अंगणवाडी याच ठिकाणी चालविण्यात येते जवळपास १०० मुले या ठिकाणी येतात . परंतु गळक्या छतामुळे मुलांना बसणे देखील अवघड झाले आहे . या संदर्भात मातंग संघर्ष समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर मरसाळे गजानन बामनकर , नरेश गायकवाड , सागर पगारे , पप्पू जाधव, संतोष खत्रे , सुरेश सौदागर यांनी काल मनपा आयुक्त गणेश पाटील यांची भेट घेऊन या समस्येबाबत चर्चा केली . यावेळी लवकरात लवकर ही समस्या सोडवण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले .

@@AUTHORINFO_V1@@