वाड्यात जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2018
Total Views |


 
वाडा :- ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिन वाडा तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने वाडा शहरामधे भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हजारो आदिवासी बांधव आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभागी होत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले. यावेळी आदिवासी समाजातील अनेक तरुणांनी आपल्या समृद्ध संस्कृतीचा अविष्कार सादर केला. तारफा नृत्य,ढोल नृत्य, पारंपरिक वाद्य आणि त्यावर ठेका धरणारे पारंपांरीक वेशभूषेतील तरुण हे मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
 

आदिवासी वाद्यांच्या निनादाने वाडा शहरातील रस्ते दुमदुमून गेले होते. वाडा शहरतील खण्डेश्वरी नाका येथून निघलेली ही शोभा यात्रा पूर्ण वाडा शहरात फिरत पंचायत समिती येथे येत येथील हुतात्मा चौकाजवळ येत येथे बिरसा मुंडा यांना श्रधांजली वाहण्यात आला. पुढे पांडुरंग जावजी हायस्कूल येथे जात अनेक मान्यवरांनी समाजप्रबोधनक भाषणे केली. राज्याचे आदिवासी विकास मंत्री पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी तमाम आदिवासी बांधवांना यावेळी शुभेच्छा दिल्या. मातृभूमी संघटना,महाराष्ट्र राज्य आदिवाशी शिक्षक संघटना,आदिवाशी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

@@AUTHORINFO_V1@@