एमपीएससीला मिळणार हक्काची जागा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2018
Total Views |


 

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला अर्थात एमपीएससीला तब्बल ६८ वर्षांनंतर स्वत:चे मुख्य कार्यालय उभारण्यासाठी जागा मिळाली आहे. त्यासाठी नवी नुंबईत बेलापूर येथे ५५०० चौरस मीटर भूखंड देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सद्यस्थितीत मुंबईत विविध तीन ठिकाणी भाड्याच्या जागेतच आयोगाचे कामकाज चालू आहे. यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला स्वत:च्या मालकीची जागा नव्हती. आयोगाच्या स्थापनेला दि. एप्रिल २०१८ रोजी ८१ वर्षे पूर्ण झालीत. त्यापैकी ६८ वर्षांपासून आयोगाचा कारभार भाड्याच्या इमारतीत चालू आहे. १९५० पासून आयोगाचे मुख्यालय फोर्टमधीलबँक ऑफ इंडियाच्या इमारतीत आहे. त्याचबरोबर माझगाव येथे विक्रीकर भवन कुपरेज येथील एमटीएनएलच्या इमारतीत सध्या आयोगाचे कामकाज सुरू आहे.
 
आयोगाला मुख्यालयासाठी स्वत:ची जागा असावी, यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. समितीच्या शिफारशीनुसार आता राज्य शासनाने आयोगाला स्वतंत्र जागा देण्याचे ठरविले आहे. नवी मुंबईत बेलापूर येथे कोकण भवनच्या जवळ सेक्टर १० मध्ये सिडकोच्या मालकीचा १० हजार चौरस मीटरचा भूखंड आहे. त्यातील हजार चौरस मीटरचा भूखंड बेलापूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी देण्यात आला आहे. उर्वरित हजार चौरस मीटरपैकी ५५०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयासाठी देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी तसे आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे तब्बल ६८ वर्षांनंतर लोकसेवा आयोगाला आपला कारभार हक्काच्या जागेत सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
@@AUTHORINFO_V1@@