हरिवंश नारायण सिंह राज्यसभेचे नवे उपसभापती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी आज मतदान करण्यात आले यामध्ये आज एनडीएचे उमेद्वार हरिवंश नारायण सिंह हे बहुमताने निवडून आले आहेत. १२५ मतांनी हरिवंश नारायण सिंह जिंकले आहेत. बहुमत सिद्ध झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरिवंश नारायण सिंह यांना राज्यसभेत शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
 
 
 
कॉंग्रेसचे उमेद्वार बी. के. हरिप्रसाद हे विरोधी उमेद्वार म्हणून उभे होते. बी. के. हरिप्रसाद यांना ९८ मते मिळाली असून त्यांचा २० मतांनी पराभव झाला आहे. हरिवंश नारायण सिंह हे पेशाने पत्रकार आहेत. गेल्या २५ वर्षांपासून ते पत्रकारितेत आहेत. रांची येथील प्रभात खबर या वृत्तपत्राचे ते अनेक वर्ष संपादक होते. अतिशय सुस्वभावी आणि पारदर्शी व्यक्तिमत्वाचे हरिवंश नारायण सिंह यांची आज राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी बहुमताने नेमणूक झाली आहे. राज्यसभेतील सभासदांनी हरिवंश नारायण सिंह यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@