चर्नी रोड व हाजी अली वर फ्लाय ओव्हरचे बांधकाम लवकरच सुरु होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2018
Total Views |



मुंबई: चर्नी रोड स्टेशनला जोडणारा फूटओव्हर ब्रिज व हाजी अलीवर नवीन फ्लाय ओव्हरचे बांधकाम सुरू करण्याचे काम लवकरच केले जाईल. महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता ह्यांनी आमदार मंगल प्रभात लोढ़ा ह्यांना ही माहिती देऊन म्हंटले की, ह्या अतिशय व्यस्त भागांमध्ये सामान्य जनतेला होणारा त्रास लक्षात घेऊन महानगरपालिका त्याबद्दल गंभीर आहे.

 

महानगरपालिका मुख्यालयामध्ये आयोजित बैठकीमध्ये आमदार मंगल प्रभात लोढ़ांच्या नेतृत्वात एका प्रतिनिधी मंडळाने मनपा आयुक्त मेहता ह्यांच्यापुढे ह्या दोन ब्रिज्सचे काम केले जावे, अशी मागणी सादर केली. ह्या बैठकीमध्ये आमदार लोढ़ा ह्यांनी चर्नी रोड फूटओव्हर ब्रिजच्या पुनर्बांधकामाला वेळ लागत असल्यामुळे रोज लाखो लोकांना होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. त्याशिवाय हाजी अली सर्कलवर फ्लाय ओव्हरच्या बांधकामामध्ये महानगरपालिकेकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दलही त्यांनी मनपा आयुक्तांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी मागणी केली की, चर्नी रोड स्टेशनकडे जाणा-या ठाकूर द्वार बाजूच्या फूट ओव्हर ब्रिजचे पुनर्बांधकाम व हाजी अली सर्कलवर फ्लाय ओव्हर बांधकाम ह्यासंदर्भात लवकर कार्यवाही केली जावी व त्यामुळे रोज लाखो लोकांना होणा-या अडचणींपासून त्यांची मुक्तता होईल. मनपा आयुक्त अजॉय मेहता ह्यांनी चर्नी रोड फूट ओवर ब्रिज व हाजी अलीवर नवीन फ्लाय ओवरच्या बांधकामासंदर्भात म्हंटले की, दोन्ही बांधकामे लवकरच सुरू केली जातील. ह्या बैठकीमध्ये नगरसेविका सरिता पाटील, डी विभाग पालिका सहआयुक्त विश्वास मोटे, ब्रिज विभागाचे प्रमुख अभियंता दराडे सहित दक्षिण मुंबई व मलबार हिल भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.

 

उल्लेखनीय आहे की चर्नी रोड़ पूर्वमध्ये प्लेटफॉर्म नंबर च्या समानांतर स्काय वॉक पूर्ण तोडण्यात आला आहे आणि १४ ऑक्टोबर २०१७ ला रात्री ८.४८ वाजता ठाकूरद्वार रोडवरून स्टेशनला जोडणारा ब्रिज गिर पडला होता. तो अजून न बनवल्यामुळे लाखो लोकांना स्टेशनपर्यंत पोहचताना त्रास सहन करावा लागतो. त्याच प्रकारे हाजी अली सर्कल मुंबईतील सर्वाधिक ट्रॅफिकचे केंद्र बनले आहे. आमदार लोढ़ा ह्यांनी विधानसभेतही अनेकदा हाजी अली सर्कलवर फ्लाय ओव्हर बनावा, अशी मागणी‌ केली आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतुदही करण्यात आली आहे. मनपा आयुक्त अजॉय मेहता ह्यांनी दोन्ही ब्रिज तत्काळ बनवण्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

@@AUTHORINFO_V1@@