भयभीत करणाऱ्या आयकर खात्याच्या नोटिसा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2018   
Total Views |

 

 
मुख्य म्हणजे तुम्ही तुमचे उत्पन्न लपविलेले नसेल, तसेच करभरणा केलेला असेल तर तुम्हाला आयकर खात्याबाबत भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. काही नोटिसा या तुम्ही आयकर रिटर्न फाईल करताना काही चूक किंवा चुका केल्या असतील तर त्या दाखविणाऱ्या त्याबाबतचे स्पष्टीकरण मागविलेल्या असतात
 

सभ्य माणसांच्या घरी पोलीस जर गणवेशात आला तर तो येताक्षणीच घरातील वातावरण अगदी भयभीत होऊन जाते. तसेच आयकर खाते एकूण पाच प्रकारच्या नोटिसा काढते. यापैकी कोणतीही नोटीस आली तरी, ज्याला नोटीस येते तो काहीसा घाबरुन जातो. करचुकवेगिरीला आळा बसावा, काळ्या पैशाच्या निर्मितीला आळा बसावा म्हणून सध्याचे केंद्र सरकार बरेच कडक वागत आहे राष्ट्रहिताच्या दृष्टीने ते योग्यच आहे. सध्याच्या काळात आयकर खात्याची नोटीस आली तर आयकर खात्यात बोलविलेल्या तारखेला जाताना नोटीस आलेला माणूस भीतीपोटी एकटाही जायला घाबरतो, असेही काही ठिकाणी पाहायला मिळते. तो सोबत वकील किंवा चार्टर्ड अकाऊंटंटना घेऊन जातो. कारण, चौकशीसाठी एखाद्याला बोलावून अटक केलेली उदाहरणे सध्या घडत आहेत. त्यामुळे या पाच प्रकारच्या नोटिसा केव्हा का पाठविल्या जातात, याची माहिती आपणास या लेखात मिळेल.  मुख्य म्हणजे तुम्ही तुमचे उत्पन्न लपविलेले नसेल, तसेच करभरणा केलेला असेल तर तुम्हाला आयकर खात्याबाबत भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. काही नोटिसा या तुम्ही आयकर रिटर्न फाईल करताना काही चूक किंवा चुका केल्या असतील तर त्या दाखविणाऱ्या त्याबाबतचे स्पष्टीकरण मागविलेल्या असतात. पण, २०१७ -२०१८ या आर्थिक वर्षाचा रिटर्न फाईल करायची तारीख जी ३१ ऑगस्टपर्यंत वाढविली आहे, या रिटर्नबाबत आयकर खात्याने असा नियम केला आहे की, जर करदात्याशी संबंधित आयकर रिटर्न फॉर्म त्याने भरता चुकीचा फॉर्म भरून रिटर्न सादर केला तर तो रिटर्न वैध मानला जाणार नाही. ऑनलाईन म्हणजे -रिटर्न फाईल करणा ऱ्याच्या संख्येत ३० एप्रिल २०१८ पर्यंत २०१६ -२०१७ आर्थिक वर्षाच्या तुलनेत २७ टक्के वाढ झाली होती. हे खरोखरच शासनाच्या प्रयत्नाचे यश मानावे लागेल.

 

१४३ (): तुम्ही रिटर्न फाईल केल्यानंतर तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम १४३ () अन्वये नोटीस येऊ शकते. या नोटीसला उत्तर द्यावे लागतेच, असे नाही. ही नोटीस असे कळवते की, तुमची रिटर्न प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. जर या नोटीसमध्ये तुमच्या बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार यात काही चूक असेल, तसेच फॉर्म २६ एएममध्ये दाखविलेले उत्पन्न तुम्ही रिटर्न फाईल करताना दाखविलेले उत्पन्न यात जर तफावत असेल किंवा मूलस्त्रोत भरणा केलेला कर तुम्ही मागितलेला रिफंड किंवा पॅन क्रमांकात चूक असेल या बाबी जर नोटिशीत नमूद केलेल्या असतील तर या नोटिशीला समाधानकारक उत्तर देऊन तुमची फाईल बंद करून घेणे, ही करदात्याची जबाबदारी असते. आयकर खात्याच्या आयकर कायदा, १९६१ अन्वये करदात्यांना कलम १४२ (), कलम १४३ ( ),कलम १४३ ( ), कलम १४३ (), कलम १४७ कलम १३९ () अन्वये करदात्यांना नोटिसा येतात. यातील काही नोटिसा या गंभीर स्वरूपाच्या आहेत. अंतिम तारखेपूर्वी किंवा संबंधित असेसमेंट वर्ष संपण्यापूर्वी रिटर्न फाईल केला नाही तर १४२ () अन्वये नोटीस काढली जाते. कलम १४३ () अन्वयेस्क्रूटिनी नोटीसकाढली जाते. यात करदात्याने उत्पन्न दडविलेले तर नाही ना, याचा पडताळा घेण्यासाठी या नोटीसद्वारा संबंधित डॉक्युमेंट्स मागविले जातात. कर कमी भरलेला नाही ना? अयोग्य कर सवलती घेतलेल्या नाहीत ना? याबाबत आयकर अधिका ऱ्याना संशय आला तर ही नोटीस काढली जाते. जर आयकर खात्याचे दावे सिद्ध झाले तर दंडही भरावा लागतो. या नोटीससोबत प्रश्नावली पाठवली जाते या प्रश्नावली द्वारा आयकर खात्याला संशयात्मक वाटणारा किंवा वाटणारे आर्थिक व्यवहार, तुमची मालमत्ता, तुमचे उत्पन्न याबाबतची माहिती विचारली जाते. या प्रश्नावलीला खरीखुरी उत्तरे द्यावीत, नाही तर कायदेशीरदृष्ट्या अडचण निर्माण होऊ शकते.

 

कारणे दाखवा नोटीस

कर कमी भरला आहे असे जर आयकर खात्याला वाटले तर करदात्यालाकारणे दाखवानोटीस पाठवून कमी भरलेला कर त्यावर दंड भरण्याचे फर्मान सोडले जाते.

 

कायदेशीर कारवाई करणाऱ्या नोटीस

जर तुम्ही १४२ () अन्वये पाठविलेल्या नोटीसकडे दुर्लक्ष केले किंवा आयकर खात्याला तुम्ही कर भरण्यासंबंधात किंवा उत्पन्नाचे मूळ जाहीर करण्याबाबत लबाडी केली आहे, तर आयकर खाते कलम १४३ ( ) अन्वये कायदेशीर कारवाईची नोटीस देऊ शकते. आयकर खात्याची कायदेशीर कारवाईची नोटीस येण्याची वेळ शक्यतो येऊ देऊ नये, कारण आयकर खात्याची कायदेशीर कारवाई फार कडक असते. जर रिटर्न बरोबर भरलेला नसेल, रिटर्न फॉर्ममधील कॉलम कोरे ठेवलेले असतील तर कलम १३९ () अन्वये नोटीस पाठविली जाते.

 

भारताबाहेर मालमत्ता किंवा उत्पन्न असेल अशांना पाठविली जाणारी नोटीस

काळा पैसा बेनामी पैसा अर्थव्यवस्थेतून जावा म्हणून हे केंद्र शासन फार प्रयत्नशील आहे. हे साध्य करण्यासाठी आयकर खाते परदेशात मालमत्ता असणाऱ्याना त्याचा तपशील मागविणारी नोटीस पाठवू शकते. अशा तर्हेची नोटीस आयकर कायदा १९६१ च्या कलम १३३ ( ) नुसार, ‘इंटेलिजन्स अण्ड क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिव्हिजन ऑफ इन्कमटॅक्स डिपार्टमेंटही पाठवू शकते. या नोटीसद्वारे परदेशातील मालमत्तेचे संपत्तीचे कायदेशीर पुरावे करदात्याकडे मागविले जातातजर तुम्ही रिटर्न ऑनलाईन फाईल केला असेल तर तुम्हाला तुमच्या - मेलवर नोटीस पाठविली जाते. -मेलवर आलेली नोटीस शांतपणे वाचून समजून घ्या त्या नोटिसीद्वारे आयकर खात्याला जी काही माहिती हवी असेल, ती लवकरात लवकर पुरवा. कित्येक नोटीसना ठराविक कालावधीत उत्तर द्यावेच लागते. प्रत्येक नोटीसला कसे उत्तर द्यायचे, याची निश्चित पद्धती आहे. तीच अनुसरायला हवी. नोटीसचा -मेल आल्यानंतर संगणकावर किंवा मोबाईलवर आयकर खात्याच्या तुमच्यामाय अकाऊंटमध्ये जा. त्यानंतरमाय पेंडिंग अक्शन्सवर क्लिक करा. नंतरफॉर युवर अक्शनवर जा. तेथे तुमच्याकडून कराच्या काही तफावतीची मागणी आहे का, ते पाहा. तुम्ही सर्व प्रकारच्या नोटीसना ऑनलाईन उत्तर देऊ शकता. काही नोटीस सेंट्रल प्रोसेसिंग केंद्र पाठविते. तुम्हाला जर आयकर अधिकाऱ्याने प्रत्यक्ष बोलाविले असेल तर मग नोटीसला ऑनलाईन उत्तर दिले तरी तुम्हाला जावेच लागेल. आयकर अधिकाऱ्याला जेव्हा तुमच्या डॉक्युमेंट्सच्या मूळ प्रती पाहावयाच्या असतात, ज्या ऑनलाईन पाहता येत नाहीत, तेव्हा आयकर अधिकारी तुम्हाला प्रत्यक्ष बोलावतो. नोटीसवर ठरवून दिलेल्या कालावधीत उत्तर द्यावे. आयकर नोटीसकडे दुर्लक्ष करणे, नोटीसद्वारे सांगितलेल्या बाबी पूर्ण करणे अशांना आयकर खाते दहा हजार रुपये दंड करू शकते. आयकर अधिकाऱ्याने मागविलेले डॉक्युमेंट नोटीस आलेला देऊ शकला नाही तर त्याला कडक शिक्षेस सामोरे जावे लागते. कर चुकविलेला सिद्ध झाल्यास प्रचलित कायद्यानुसार अशा करदात्यास चुकविलेल्या कराच्या ३०० टक्के दंड सात वर्षांपर्यंची कैद अशा शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे प्रामाणिकपणे उत्पन्न जाहीर करा प्रामाणिकपणे कर भरा आणि सुखाची झोप घ्या. तुम्हाला ज्या तारखेला आयकर कार्यालयात बोलावले असेल, त्या तारखेला तुम्हाला आयकर अधिकाऱ्याला समाधानकारक उत्तरे देणे किंवा डॉक्युमेंट्स देणे शक्य नसेल तर तुम्ही पुढची तारीख विनंती करून घेऊ शकता. तुम्ही स्वतः आयकर खात्याला तोंड देण्यास असमर्थ आहात, असे वाटत असेल तर चार्टर्ड अकाऊंटंटची मदत घ्यावी. आयकर नोटीससहजघेऊ नका. आयकर खात्याला वाटले की, जर तुमचे काही उत्पन्नअसेसझालेले नाही तर आयकर खाते तुम्हाला १४७ कलमान्वये नोटीस पाठविते. तुम्ही फाईल केलेल्या रिटर्नमध्ये उत्पन्नाबाबत, कर भरण्याबाबत, कर सवलती घेण्याबाबत त्रुटी आढळल्या तर आयकर खात्याची कलम १४३ () अन्वये नोटीस येते. प्रत्येक भारतीयाने आयकर सर्व तर्हेचे कर भरणे हे राष्ट्रीय कर्तव्य मानावे राष्ट्र उभारणीस हातभार लावावा!

 
@@AUTHORINFO_V1@@