जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2018
Total Views |


 

९ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी माणूस हा परिस्थितीने जरी गरीब असला, तरी तो मनाने श्रीमंत असतो. आदिवासींबद्दल खरे सांगायचे झाले, तर जल, जंगल आणि जमीन यांचा रक्षणकर्ता म्हणून आदीवासींची ओळख आहे.
 

संयुक्त राष्ट्र संघटना अर्थात ‘युनो’ या जागतिक संघटनेने जगात राहणाऱ्या आदिवासींच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने ९ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानेदेखील ९ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी माणूस हा परिस्थितीने जरी गरीब असला, तरी तो मनाने श्रीमंत असतो. आदिवासींबद्दल खरे सांगायचे झाले, तर जल, जंगल आणि जमीन यांचा रक्षणकर्ता म्हणून आदीवासींची ओळख आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधून त्यांच्यामार्फत संवर्धनही होते. मानवाचे अस्तित्व टिकविण्यासाठी एवढे महान कार्य आदिवासी जनजाती करीत असतात, ही फार अभिमानाची बाब आहे. आदिवासी स्त्री-पुरूष स्वभावाने साधेभोळे आणि मनाने स्वच्छ असतात. त्यांची विचारसरणी सकारात्मक असून सर्वधर्मसमभावाने ते सर्वांशी वागत असतात. आदिवासी जमातीचे संपूर्ण देशात वास्तव्य आहे. भारतामध्ये मिझोराम, नागालँड व मेघालय या छोट्या राज्यांमध्ये आदिवासींची लोकसंख्या त्या त्या राज्यांच्या तुलनेत ८० ते ९३ टक्के इतकी आहे, तर मध्यप्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, बिहार, गुजरात, राजस्थान, छत्तीसगढ आणि झारखंड या राज्यांमध्ये त्या-त्या राज्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत ८ ते २३ टक्के इतकी लोकसंख्या आहे. आपला देश विकसनशील देशाच्या श्रेणीत असूनही आजही आदिवासींमधील बहुतेक जमाती या समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. शासनामार्फत ज्या काही योजना या समाजासाठी अंमलात आणल्या जात आहेत, त्याचा लाभ अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, ही खेदाची बाब आहे. वाढत्या महागाईपासून आजही आदिवासींना त्यांच्या दैनंदिन गरजा भागविणे शक्य होत नाहीत. त्यामुळे हा घटक मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. त्याचे मुख्य उदाहरण म्हणजे कुपोषणाची समस्या आजही या समाजातील माता व महिलांना भेडसावत आहे. समाजातील या शेवटच्या घटकाला शासनाच्या योजनांचा लाभ जेव्हा मिळेल, तेव्हा खऱ्या अर्थाने हा समाज उन्नत झाल्याचे मानण्यात येईल. रामायणात प्रभू रामचंद्रांनी आदीवासींसोबत १४ वर्षे रानावनात घालविले. त्यांना वनवासी अतिप्रिय होते. याशिवाय ‘शबरीची बोरं’ ही गोष्ट सर्वांना माहितीच आहे. इतकेच नव्हे, तर मेवाडचे राजा महाराणा प्रताप यांना हळदीघाटाच्या युद्धात अकबर बादशहाच्या बलाढ्य सेनेला पराभूत करण्यासाठी भिल्लं जातीच्या धनुर्धारी सैनिकांनी मोठी मदत केली. मेवाडच्या महाराजाने उपकाराच्या भावनेतून आपल्या राजचिन्हावर एकीकडे सैनिक व दुसरीकडे भिल्ल माणसाची प्रतिमा कोरली. यावरून हे सिद्ध होते की, आदिवासी माणसं केवळ लढाऊ नव्हे तर, निष्ठावानही असतात. यासाठी आदिवासी बंधुभगिनींना माझा मानाचा मुजरा!

 

या दिनानिमित्त आदिवासी समाजाचे दैवत स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांचे स्मरण करणे आवश्यक आहे. खरेतर बिरसा मुंडा यांनी आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी दिलेल्या लढ्याची ही पावतीच आहे. बिरसा मुंडासारख्या गरीब कुटुंबातील युवकाने ब्रिटिश राजवटीशी झुंज देऊन ख्रिस्ती मिशनरींच्या धर्मांतर करण्याच्या अमानवी कृत्यांना पायबंद घातला व आदिवासींची सुटका केली. बिरसा मुंडा यांनी रामायण, महाभारत व अन्य हिंदू धर्मातील ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. त्यांना हिंदू धर्माविषयी नितांत आदर होता. विशेष म्हणजे बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश राजवटीविरूद्ध लढा देऊन त्यासाठी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी आपल्या प्राणाची आहुती दिली. क्रांतीकारी बिरसा मुंडा यांच्या बलिदानाची महती भारतीयांना कळावी, यासाठी लेखिका महाश्वेता देवीने ‘उलगुलान एक क्रांती’ ही कादंबरी लिहिली. आज संसदेमध्ये बिरसा मुंडा यांची प्रतिमा लावण्यात आली आहे. हेच त्यांच्या कामगिरीचे फलित आहे. आदिवासी समाजाच्या बंधुभगिनी आणि विद्यार्थी मित्रांना ‘जागतिक आदिवासी दिना’निमित्त शुभेच्छा!

 

-प्रसाद ठाकूर

@@AUTHORINFO_V1@@