अजित ताडगे, शैलेंद्र आजगे यांची नियुक्ती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2018
Total Views |


 
नाशिक : - भारतीय जनता पार्टीच्या दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या विस्तारकपदी अजित ताडगे यांची नियुक्ती झाली आहे. नाशिक लोकसभा मतदार संघासाठी हीच जबाबदारी शैलेंद्र आजगे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या दोघांच्याही निवडीचे भाजपा कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
 

ताडगे आणि आजगे हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी आतापर्यंत अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहे. या कार्याची पावती म्हणूनच आगामी निवडणुका लक्षात घेवून पक्षाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपविली आहे. नेमून दिलेल्या लोकसभा मतदार संघात बूथ रचना सक्षम करणे आणि संपर्क अभियान मोहीम प्रभावीपणे राबविण्याची कामगिरी त्यांना करावी लागणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजय साने, खा.हरिचंद्र चव्हाण,आ.बाळासाहेब सानप, आ.देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, आ.राहूल आहेर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील आदींनी अभिनंदन केले.

@@AUTHORINFO_V1@@