कल्याण-डोंबिवलीचे साडेसहा हजार कोटी कुठे गेले?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2018
Total Views |

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सवाल 

आधी आश्वासने देऊन मग विसरायची कशी हे भाजपकडून शिकावे : जयंत पाटील


 
 
 
मुंबई : लोकांना आश्वासने द्यायची आणि निवडणुकीनंतर विसरायची कशी हे भाजपाने भारतात शिकवले आहे. कल्याण-डोंबिवलीकरांना मुख्यमंत्र्यांनी साडेसहा हजार कोटीच्या पॅकेजचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी कल्याण-डोंबिवलीपासून सुरुवात करावी याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयुक्तांना करुन दिली. निवडणूक न लढविणाऱ्या आणि आश्वासनांची पूर्तता अहवाल सादर न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी आज मुंबईत दिली. त्यावर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागतच केले. परंतु त्याची अमलबजावणी करताना त्याची सुरुवात कल्याण-डोंबिवलीकरांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनापासून करावी याची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली.
 
 
 
नगरपालिकेत, महानगरपालिकेत जर पक्षाने आश्वासन दिले असेल व ती पूर्ण नाही केली तर त्या पक्षाची परवानगी आणि त्या पार्टीच्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची भूमिका सहारिया घेणार का, असा सवालही जयंत पाटील यांनी केला. सहारिया यांनी पक्षांनी जाहीर केलेले जाहीरनामे प्रकाशित करण्याअगोदर निवडणूक आयोगानी ते अगोदर मागवून घ्यावेत. ते तपासावेत, त्याच्यासाठी निवडणूक आयोगाने पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा करावी आणि त्यांची कमिटमेंट घेऊन मग ते जाहीरनामे प्रसिध्दीला द्यावेत आणि ते प्रसिध्द केल्यानंतर त्या जाहीरनाम्यातील मुद्दे पूर्ण केले नाहीत म्हणजे ७० टक्के मुद्दे पूर्ण केले नाहीत तर त्या पार्टीला किंवा त्या गटाला पुढच्या निवडणूकीमध्ये उभे राहण्यास मज्जाव करावा असा क्रांतिकारक निर्णय सहारिया घेणार असतील तर त्यांचे स्वागत आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
 
 
महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका, नगरपरिषदा आणि जिल्हा परिषदांमध्ये सर्व पक्ष जेवढं जमेल तेवढंच बोलतील त्यामुळे सहारिया यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करतो. त्यांनी ते ताबडतोब शेवटच्या स्तरापर्यंत न्यावे. आम्हा वेगवेगळया पक्षाच्या लोकांना बोलावून घ्यावे, आम्ही काही चांगल्या सूचना आणि अमलबजावणी कशी करायची याची माहिती देऊ, असा सल्लाही जयंत पाटील यांनी दिला.
 
@@AUTHORINFO_V1@@