पाणी समस्येविषयी महापालिका आयुक्तांनी केले पाणी समस्यांचे निराकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2018
Total Views |



ठाणे : पालिका हद्दीतील नागरिकांच्या पाणी प्रश्नाच्या तक्रारीचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी निराकरण केले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाणी समस्येबाबत महापालिका मुख्यालयात मंगळवारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जनहित याचिका क्र.३६ /२०१६ मधील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घरगुती वापराच्या पाणी पुरवठ्याबाबतच्या तक्रारींचे निराकरण करणेसंबंधी समिती गठण करण्यात आली आहे. या समितीच्या बैठकीत नागरिकांच्या घरगुती पाण्याबद्दलच्या लेखी तक्रारीचे महापालिका आयुक्त श्री. जयस्वाल यांनी निरसन केले. यावेळी ठाणे महापालिका क्षेत्रातील वेगवेगळ्या परिसरातील २६ लेखी तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा,अनियमित पाणी पुरवठा,नळ जोडणी,दुषित पाणी पुरवठा,पिण्याच्या पाण्याची पाईपलाइन बदलणे,पाणी बिल आदी अनेक तक्रारीचे यावेळी निरसन करण्यात आले.पावसामुळे झोपडीपट्टी परिसरात दूषित पाणी पुरवठा होतो यावर लवकरच पालिकेच्यावतीने उपाययोजना करण्यात येणार आहे . दरम्यान नागरिकांच्या पिण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत योग्य ती काळजी घेवून नागरिकांचे पाणी प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश महापालिका आयुक्तानी संबंधित अधिकर्‍यांना दिले आहेत. नागरिकांनी आपल्या तक्रारी अत्यंत मोकळेपणाने आयुक्तांसमोर मांडल्या. नागरिकांच्या तक्रारी ऐकत आयुक्तांनी नागरिकांशी सुसंवाद साधला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ . जगदीश पाटील आणि जिल्हा न्यायसेवा प्राधिकरणाचे सचिव एन. वाय. गौड उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@