पुणे विद्यापीठात नागरी स्वच्छता व पाणीपुरवठाविषयक अभ्यासक्रम सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2018
Total Views |
 
 
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नागरी स्वच्छता आणि पाणीपुरवठा विषयी अभ्यासक्रम सुरू होत आहे. देशात प्रथमच विद्यापीठ स्तरीय शिक्षणात अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.
 
याविषयी माहिती देताना विभागप्रमुख डॉ. सुरेश गोसावी म्हणाले की, देशात आतापर्यंत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी नागरी स्वच्छता आणि पाणी पुरवठा व्यवस्थापन याविषयी अभ्यासक्रम उपलब्ध नव्हता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पहिल्यांदाच असा अभ्यासक्रम सुरू होत आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. त्यासाठी विद्यापीठाने नेदरलँडची ‘आयएचई’ ही जगभरात पाणी विषयावर काम करणारी संस्था आणि पुण्यातील युनिटी कन्सल्टंट यांच्याशी सहकार्य करार केला आहे. हा अभ्यासक्रम १० सप्टेंबर रोजी सुरू होईल. याविषयी सविस्तर माहिती विद्यापीठाच्या campus.unipune.ac.in संकेतस्थळावर ‘डिपार्टमेंट आफ एन्वायर्न्मेंट स्टडीज्’ या विभागामध्ये मिळू शकेल.
 
या अभ्यासक्रमासाठी अत्याधुनिक पद्धतीने अध्यापन केले जाणार आहे. ‘आयएचई’ संस्थेतील तज्ज्ञ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि वेबिनार या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. तसेच, पुण्यातील युनिटी कन्सल्टंटच्या वतीनेही काही मान्यवर विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमावर आधारित इत्यंभूत माहिती देण्यासाठी विद्यापीठाला सहाय्य करतील. तसेच, पर्यावरणशास्त्र विभागातील प्राध्यापकही या अभ्यासक्रमासाठी अध्यापन करतील, अशी माहितीही डॉ. गोसावी यांनी दिली.
 
@@AUTHORINFO_V1@@