खारफूटी रोपांची लागवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2018
Total Views |


 

डोंबिवली : जागतिक खारफुटी दिनानिमित्त डोंबिवलीतील खाडी किनारी परिसरात खारफूटी रोपांची लागवड करण्यात आली आहे. ठाणे, कल्याण महसूल विभाग, पर्यावरण दक्षता मंच आणि बिर्ला महाविद्यालय पर्यावरण विज्ञान शाखा यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खारफूटी लागवडीआधी त्यांच्या संवर्धना संदर्भातही मागदर्शन करण्यात आले. डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील खाडी किनारी भागात खारफुटी रोपांची लागवड करण्यात आली. खारफुटी लागवड उपक्रमात बिर्ला महाविद्यालयातील पर्यावरण विज्ञान शाखेतील ५० विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले होते. खारफुटीचे रोपण, त्याची वाढ, तेथील जमिनीचा पोत याची माहितीही विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली. खाडी किनारच्या गाळात उतरून विद्यार्थ्यांनी लाल, दुधी प्रकारच्या खारफुटीची लागवड केली. कोरडया जमिनीवर वृक्षारोपणाचे कार्यक्रम करणे आणि गाळात उतरून खारफुटी लागवड करणे किती आव्हानात्मक असते याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.
@@AUTHORINFO_V1@@