जगातील सर्व कलांचा उद्‍गाता आदिवासी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2018
Total Views |


 


आज दि. ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. हा दिवस म्हणजे नाशिक जिल्ह्यासह राज्यात आदिवासींचा उत्सव म्हणून साजरा होणारा दिवस. या दिवशी आपल्या कला, संस्कृतीचे सादरीकरण मोठमोठ्या पारंपरिक वाद्यांसह मिरवणुका काढून केले जाते. या दिवसाच्या निमित्ताने आदिवासी बांधवांच्या विषयी महत्त्वपूर्ण माहिती देणारा हा लेख...

 

आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे. आदिवासी म्हटले की, डोंगरदऱ्यांत राहणारा, जंगलात राहणारा, तोकड्या कपड्यात वावरणारा, आधुनिक जगाशी कुठलाही संपर्क नसणारा समाज डोळ्यासमोर येतो. असे म्हटले जाते की, जगाच्या पाठीवर ज्या माणसाने, ज्या जिवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव म्हणजेच आदिवासी. आज जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहेत, त्या सगळ्या कलांचा उद्गाता आदिवासी आहे. आदिवासींची लोककला, चित्रकला, नृत्य, वादन, गायन, शिल्पकला याला तोड नाही. आदिवासी आजही आपली उपजीविका जंगलात मिळणाऱ्यां रानमेवाव्यावर करीत आहे. आजही नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, गडचिरोली, चंद्रपूर, ठाणे, किनवट या भागात राहणारे आदिवासी बांधव जंगलाच्या जवळच राहणे पसंत करतात. ‘आदिवासी तेथे जंगल, जंगल तेथे आदिवासी’ असल्यामुळे निसर्गातील प्रत्येक वस्तूला ते दैवत मानतात. निसर्गावर त्यांची निस्सीम श्रद्धा आहे. संयुक्त राष्ट्रसंघटना आणि तिची संलग्न संस्था आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने आदिवासींना ‘इंडिजिनस’ अर्थात देशज, मूळनिवासी असे संबोधावे, अशी शिफारस केली आहे.

 
संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक आदिवासी समुदायाच्या अधिकाराच्या रक्षणार्थ १९९३ हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. तसेच, ९ ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी हेच पृथ्वीचे मूळनिवासी आहेत आणि ४६१ आदिवासी जमाती भारतात वास्तव्यास आहेत. आदिवासींच्या जातीत आज आणखी काही जाती समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. संयुक्त राष्ट्राच्या प्रेरणेने १९९४ -२००५ हे ‘आदिवासी दशक’ म्हणून साजरा करण्यात आले. भारतामध्ये प्रामुख्याने चेंचू इरुला, कदार, कोटा या निग्रो, प्रोटो ऑस्ट्रॉलॉईड या वांशिक जमाती केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात राहतात. मध्य भारतात बिहार, ओडिशा, मध्य प्रदेश, पं. बंगाल या राज्यामध्ये गोंड, संथाल, भूमजी, हो, ओरियन, मुंडा, कोरवा या प्रमुख जाती वास्तव्य करतात. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दमण-दीव, दादरा, नगर हवेली या राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात ‘भिल्ल’ या प्रमुख जमातीचे लोक राहतात. या व्यतिरिक्त कोळी, कोकणा-कोकणी, वारली, ठाकूर, कातकरी, आंध्र परधान, कोलाम, कोरकू, माडिया, गोंड, राज-गोंड या जमाती राहतात. आदिवासींमध्येही अनेक स्वातंत्र्यसैनिक होते, होऊन गेले. यात क्रांतिकारक बाबूराव शेडमाके, नारायणसिंह उईके, राघोजी भांगरे, बख्त बुलंद शहा, दलपतशहा, रघुनाथ शहा, विरांगणा राणी दुर्गावती मडावी, कुमरा भीमा, यांचा समावेश होता.
 

-पद्माकर देशपांडे/हेमंत चंद्रात्रे

@@AUTHORINFO_V1@@