डॉ. हेडगेवार, संघ आणि स्वातंत्र्य लढा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार हे जन्मजात स्वातंत्र्यसेनानी होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज, खालसा पंथाची मुहूर्तमेढ रोवलेले श्री गुरु गोविंदसिंह व आर्यसमाजाचे संघटक स्वामी दयानंद यांच्याप्रमाणे डॉ. हेडगेवारांच्या मनात संघासारख्या मजबूत संघटनेच्या कल्पनेने घर केले होते. भारताची सनातन राष्ट्रीय ओळख असलेले हिंदुत्व, भगवा ध्वज, अखंड भारतवर्षाचे संपूर्ण स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य संग्राम आदी सर्व विचार आणि योजना त्यांच्या मस्तकात बालपणापासूनच आकार घेऊ लागलेल्या होत्या. वंदे मातरम् हा बाल केशवचा दीक्षा मंत्र झाला होता. केशव हे प्रारंभापासूनच कुशल संघटक, लोकसंग्रह करणारे, निर्भय व साहसी होते. बालमित्रांबरोबर ते क्रांतीच्या विषयावर चर्चा करीत होते. डॉक्टर हेडगेवारांच्या बालपणात या महान स्वातंत्र्य सेनानीच्या पुढील जीवनातील कर्तृत्वाचा पाया घातला गेला.
 
डॉ. हेडगेवारांनी विद्यार्थी जीवनातच भारताचे पतन व पारतंत्र्याची कारणमीमांसा करीत देशाची स्वाधिनता आणि स्वातंत्र्याचे आपले ध्येय निश्‍चित केले होते. २२ जून, १८९७ रोजी महाराणी व्हिक्टोरियाचा ६० वा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला गेला होता. या निमित्ताने शाळांमधील विद्यार्थ्यांना मिठाई वाटण्यात आली होती. बाल केशवने‘आपल्या हिंदूंचे राज्य जिंकणार्‍या राणी व्हिक्टोरियाचा जन्मदिन आम्ही समारंभपूर्वक का साजरा करावा?’ असे म्हणत सर्व मिठाई कचर्‍याच्या टोपलीत फेकून दिली होती. या कृतीसह त्यांनी या विदेशी राणीबद्दल वाटत असलेली तीव्र संतप्त भावना व्यक्त केली होती.
 
१९०९ मध्ये इंलंडचा सम्राट सातवा एडवर्ड याच्या राज्यारोहण उत्सवदिनी इंग्रज व त्यांच्या निष्ठावंत लोकांनी आपले घर, दुकान व कार्यालयांवर रोषणाईसह आतिषबाजी केली होती. नागपूरच्या प्रसिद्ध एम्प्रेस मिलच्या मालकांनीही आपल्या उद्योग भवनाच्या चहूबाजूला रंगीबेरंगी रोषणाई केली होती. शहरातील बहुसंख्य लोक आपल्या मुलाबाळांसह हे दृश्य पाहण्यासाठी गेले होते. बाल केशव मात्र आपल्या मित्रांना म्हणाले की, विदेशी राजाच्या राज्यारोहणाचा उत्सव साजरा करणे आपल्यासाठी लाजिरवाणी बाब होय. जे विदेशी राज्य आपल्याला उखडून फेकायचे आहे त्याचा उत्सव साजरा करणार्‍यांचा धिक्कार असो! मी मुळीच जाणार नाही व कुणालाही जाऊ देणार नाही. केशव यांच्यावर अंत:करणापासून प्रेम करणार्‍या त्यांच्या मित्रांनी त्याची मानसिक वेदना व मनात हेलावणारी देशभक्तीची भावना समजून घेत विदेशी राजाच्या राज्यारोहणाबद्दल आनंद व्यक्त करण्यापेक्षा आपणास विदेशी राज्यच उखडून फेकण्याची योजना तयार केली पाहिजे, असे ठरवले.
 
जसजसा काळ लोटत गेला तसतशी बाल केशव यांच्या मनात जागृत होत असलेली उत्कट स्वातंत्र्याकांक्षा प्रचंड वेगाने वाढू लागली होती. नागपूरपासून थोड्याच अंतरावर असलेला सीताबर्डी किल्ला कोणे एके काळी हिंदू राजांच्या ताब्यात होता. या किल्ल्यावर इंग्रजांचा झेंडा (युनियन जॅक) का आहे? तेथे तर आपला भगवा ध्वज असला पाहिजे. मग केशवांसह या बालगोपाळांनी किल्लयापर्यंत भुयार खोदून तेथे पोहोचून किल्ल्याच्या पहारेकर्‍यांशी लढून युनियन जॅक उखडून फेकून देत त्याच्याजागी भगवा झेंडा फडकावण्याची योजना आखली. केशव व त्यांचे मित्र वजेह गुरुजींच्या घरात राहून शिक्षण घेत होते. या सात-आठ बालकांचे नेता असलेले केशव यांनी वजेह गुरुजींच्या घराच्या एका खोलीपासून भुयार खोदण्यास सुरुवात केली. एका रात्री फावडे, कुदळी, घमेली यांच्या साह्याने खोदकाम सुरु असतांना त्याचा आवाज वजेह गुरुजींनी ऐकला. आतून बंद केलेल्या दरवाजाला धक्का मारुन गुरुजी आत आले तेव्हा ते आश्चर्यचकितच झाले! ही बालसेना तेव्हा किल्ल्यावर चढाई करण्याच्या तयारीत होती. गुरुजींनी सर्वांची समजूत घालून त्यांना शांत केले.
 
या घटनेवरुन बाल केशव यांचे संघटन कौशल्य, टोळी तयार करण्याची क्षमता, गुप्तरुपाने कार्य करण्याची पद्धती आणि ध्येयपूर्तीसाठी काहीही करण्याची हिंमत यांचा परिचय मिळतो. काही दिवसानंतर वजेह गुरुजींनी आपल्या एका सहकार्‍याला सांगितले की, हा मुलगा मोठा होऊन शक्तीशाली हिंदू संघटनेला जन्म देईल आणि ब्रिटिश साम्राज्याविरोधात पेटलेली स्वातंत्र्याची मशाल शतपटीने प्रज्ज्वलित करील.
 
बाल केशव यांनी आपल्या मित्रांबरोबर जवळपासच्या जंगलात जाऊन ‘किल्ला सर करा व ध्वज जिंकून आणा’ यासारखे मार्शल आर्ट खेळणे सुरु केले. अशाच प्रकारच्या युद्धात छत्रपती शिवाजी महाराज आपल्या बालमित्रांसह खेळत होते. यावेळी केशव यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे एक चर्चा मंडळ गठित झाले. या मंडळात हिंदू महापुरुष, योद्धे व देशभक्त क्रांतिकारक नेत्यांच्या जीवनातील प्रसंगांवर चर्चा व्हायची. याचाकाळात मध्यप्रदेशातील एक संघटना स्वदेश बांधवतर्फे स्वदेशी वस्तूंच्या प्रचारमोहिमेस सुरुवात झाली. केशव व त्यांच्या मित्रांनीही त्यात सहभाग घेतला. १९०५-०६ च्या सुमारास लोकमान्य टिळकांच्या योजनेनुसार गुप्त बैठका सुरु झाल्या. त्यातून क्रांतिकारक तयार करण्यात येत होते. बाल केशवचा त्यात सक्रिय सहभाग होता.
 
शाळेच्या उन्हाळी सुटीत केशवराव आपल्या मामांच्या घराजवळील नागपूरजवळील रामपाइली येथे जात होते. तेथेही त्यांनी युवकांचे एकत्रीकरण केले. सर्व युवकांना स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्याची प्रेरणा दिली जाऊ लागली. प्रतिवर्षी दसर्‍याच्या दिवशी रामपाइली नगरात रावणदहन केले जाई. यावेळी केशवराव यांनी युवकांबरोबर वंदे मातरम् गीत म्हटले व ओजस्वी भाषणही दिले. ते म्हणाले, ‘‘सध्याची सर्वात दु:खदायक व लाजिरवाणी गोष्ट म्हणजे आपण पारतंत्र्यात आहोत ही. पारतंत्र्यात खितपत राहणे हा सर्वात मोठा अधर्म होय. पापी आणि परकियांचा अन्याय सहन करणे हे देखील महापाप आहे. म्हणून आपण आता विदेशी गुलामगिरीच्या विरोधात उभे राहून इंग्रजांना सातासमुद्रापलीकडे पाठवून देणे हेच खरोखर सीमोल्लंघन होय. रावणवधाचे आजचे तात्पर्य म्हणजे इंग्रजी साम्राज्याचा शेवट करणे होय.
 
 
सरकारी गुप्तचरांनी पाठविलेल्या अहवालाच्या आधारावर केशवरावांना अटक करण्यात आली. ही त्यांच्या जीवनातील पहिली अटक होती. त्यांचे लहानगे वय पाहून जिल्ह्याच्या कलेक्टरने केशव यांना माफी मागण्यास सांगितले. त्यावर या युवकाने ताठ मान करीत कलेक्टरला सुनावले, ‘मी आपल्या आदेशाचे उल्लंघन करीत आहे. वंदे मातरम् म्हणणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार असून मी जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत ते म्हणत राहणार आहे!’ काही दिवस त्यांना कारावासात ठेवल्यानंतर सोडून देण्यात आले.
 
या घटनेनंतर केशवरावांच्या प्रत्येक हालचालीवर सरकारी गुप्तचर नजर ठेवू लागले. जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना सार्वजनिक ठिकाणी भाषण करण्यास मनाई केली. युवकांमध्ये पसरत असलेल्या इंग्रजांच्या विरोधातील असंतोष दाबून टाकण्यासाठी सरकारने रिसले-सर्कुलर नावाचे एक सूचनापत्रक जारी करीत वंदेमातरम् म्हणण्यावर बंदी घातली. केशवरावांनी आपल्या युवा छात्र वाहिनीमार्फत या बंदीच्या ठिकर्‍या उडविण्याचा निर्णय घेतला. सर्व योजना गुप्त राखण्यात आली. जेव्हा शिक्षण निरीक्षक व शाळेचे मुख्याध्यापक दहावीच्या वर्गात पाहणीसाठी गेले तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी उच्च स्वरात वंदे मातरम्चा जयघोष केला. हाच उद्घोष सर्वच वर्गांमधून होऊ लागला. सर्वच शाळा वंदे मातरम्ने गर्जून उठली. यामागे कोण नेता आहे? कुठे योजना बनली? हे सर्व कसे झाले? हे कुणालाच काही समजू शकले नाही. त्यामुळे निरीक्षक, मुख्याध्यापक व सरकारी गुप्तचरांनी आपले डोके पिटून घेतले. मग सरकारी अधिकार्‍यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याचे ठरवले तेव्हा केशवरावांनी त्यांना वाचविण्यासाठी स्वत:चे नाव जाहीर करीत म्हटले, हे सर्व मी केले. वंदे मातरम् म्हणणे हा आमचा अधिकार आहे. मी माफी मागणार नाही. त्याबरोबर केशवरावांना शाळेतून काढून टाकण्यात आले.
 
शाळेतून काढून टाकल्यानंतरही केशवरावांनी आपल्या क्रांतिकारक हालचाली थांबविल्या नाहीत. त्या काळातील देशभक्त नेते लोकमान्य टिळक, महर्षि अरविंद आणि डॉक्टर मुंजे यांच्या योजनेनुसार यवतमाळ येथे विद्यागृह नावाची शाळा चालविली जायची. केशवरावांना या शाळेत प्रवेश देण्यात आला. केशवरावांनी दहावी इयत्तेची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्णहोत लोकमान्य टिळकांच्या आशिर्वादाने कलकत्ता येथे डॉक्टरकीचे शिक्षण घेण्यासाठी गेले. तेथे जाण्यामागे त्यांचा उद्देश तेथील क्रांतिकारी संघटना अनुशीलन समितीत सामील होऊन इंग्रजांविरुद्ध देशव्यापी चळवळीला उत्तेजन देणे हा होता. (क्रमश:)
 
 
- नरेंद्र सहगल
मो.९८११८०२३२०
 
@@AUTHORINFO_V1@@