सर्वोच्च न्यायालयात तीन नव्या न्यायाधीशांचा शपथविधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज तीन नवीन न्यायाधीशांनी शपथ घेतली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी या तीन न्यायाधीशांना शपथ दिली आहे. मुख्य न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी, न्यायाधीश विनीत शरण, न्यायाधीश एम जोसेफ यांना आज शपथ देण्यात आली आहे. या तिन्ही न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ ग्रहण केली. 
 
 
 
आज सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी इंदिरा बॅनर्जी, विनीत शरण, एम जोसेफ यांना शपथ दिली असून त्यांच्या हाती त्यांच्या कामाचा कार्यभार सुपूर्द केला. या तिन्ही न्यायाधीशांना सरकारने पसंती आणि सहमती दर्शविली होती त्यामुळे या तिन्ही न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या २५ झाली आहे. एकूण ३१ न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात कार्यरत राहू शकतात. 
 
 
 
न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी या पहिले मद्रास उच्च न्यायालयात न्यायाधीश होत्या तर विनीत शरण, एम जोसेफ हे ओडीसा आणि उत्तराखंड येथील सरन्यायाधीश होते.  
 
@@AUTHORINFO_V1@@