महापालिका अग्निशमनदलाची शारीरिक क्षमता वाढणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018
Total Views |



मुंबई : मुंबई अग्निशमनदलातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी व्यायामाची गरज असून अग्निशमनकेंद्रावर अधिकारी, कर्मचाऱ्यासाठी महापालिका व्यायामशाळा उभारणार आहे. सहा केंद्रांच्या ठिकाणी या व्यायामशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. उर्वरित २८ केंद्राच्या ठिकाणीही लवकरच व्यायामशाळा सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी एक कोटी सहा लाख रुपये खर्च करून आवश्यक उपकरणांची खरेदी करण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार असल्याचे समजते.

 

काळबादेवी येथील गोकुळ निवासात जून, २०१५ रोजी भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत अग्निशमनदलाचे अधिकारी मृत पावले होते. या आगीच्या चौकशीसाठी नियुक्त समितीने अग्निशमनदलाची शारीरिक क्षमता वाढविणे आवश्यक असल्याची शिफारस केली होती. त्यासाठी व्यायामशाळा आवश्यक आहे, असे अहवालात म्हटले होते. त्याअनुषंगाने अग्निशमनदलाने आतापर्यंत सहा केंद्राच्या ठिकाणी व्यायाशाळा सुरू केल्या आहेत. उर्वरित २८ केंद्रांच्या ठिकाणीही या व्यायामशाळा सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी अग्निशमनदलाने व्यायामशाळेला आवश्यक साहित्यांचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटदारांकडून निविदा मागवल्या होत्या. यामध्ये तीन कंत्राटदार पात्र ठरले.

@@AUTHORINFO_V1@@