डीबीटी रद्दच्या मागणीसाठी तळोद्यात विद्यार्थ्यांचा ठिय्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2018
Total Views |
 
 
तळोदा :
राज्यात डीबीटी रद्द करण्यात यावे यासह वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यात वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रकल्पस्तरावर राज्यव्यापी ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला. आदिवासी हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष पदमाकर वळवी यांनी पाठिंबा जाहीर करीत मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पाऊस आला आहे.
 
 
डीबीटी वर सर्व आदिवासी आमदार, खासदार पक्ष बाजूला सोडून एकत्रित आहेत तरीदेखील सरकारचा या निर्णयाबाबत अट्टाहास का? आमची लढाई फक्त पोटासाठी आहे. आमचा पैसा आमची योजना राबविण्यात राज्यात सर्व आदिवासी संघटना यांनी ९ ऑगस्ट रोजी डीबीटी रद्द करण्याबाबत मागणी करणे आवश्यक आहे. शासकीय वसतिगृह बंद करण्याचा कुटील सरकार आखत असून आम्ही तो हानून पाडू. डीबीटी लागू झाल्यामुळे वसतितगृह बंद पडण्याची भीती असून आदिवासी विद्यार्थी शिकू नये हाच मुख्य उद्देश आहे, असा आरोपही यावेळी झाला.
 
 
रस्त्यावर गाडी फोडण्याने काहीच होणार नाही, त्यापेक्षा मुख्यमंत्री व मंत्रालयात काहीतरी फोडले पाहिजे. आम्ही शासनात असताना निर्णय बदलला नाही, मागण्या मान्य झाल्या नाही तर आदिवासी मंत्र्याला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही. यावेळी माजी जि. प. सभापती सी. के. पाडवी जयसिंग माळी, रोहिदास पाडवी, माजी सभापती आकाश वळवी, झेलसिंग पावरा, प्रकाश ठाकरे उपस्थित होते.
 
 
सामाजिक संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा
आदिवासी हक्क संरक्षण समिती, मा,क,पा,आदिवासी युवा शक्ती तसेच कॉंग्रेस कमिटी, यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.
तळोदा प्रकल्पाअंतर्गत असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी दिवसभर ठिय्या मांडला होता.
 
@@AUTHORINFO_V1@@